कृषिराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमधील भातपीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा; ना. दादा भुसे

▪️अतिवृष्टीमुळे भातपीकाच्या झालेल्या नुकसानीकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्ग,दि.१४: जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता भातपिक नुकसानीचे कृषिविभागामार्फत पंचनामे करावेत अशा मागणीचे पत्र दिले. त्यावर ना.दादा भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसाला असल्या कारणाने जिल्ह्यामधील ९० टक्के लोक हे शेती करून यामाध्यमाने आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उन्हाळी व पावसाळी शेती असे शेतीचे दोन प्रकार असून वेगवेगळ्या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात भातपिक लागवड केली जाते. परंतू कोकणात केली जाणारी शेती हि पावसावर अवलंबून असते. यावर्षीचा विचार केला असता दरवर्षी पेक्षा दिडपट जास्त पाऊस पडला आहे. तब्बल सरासरी ५००० मि.ली. पाउस पडल्याने या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भातपिकाच्या झालेल्या नुकसानीचा विचार केला असता, जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची नविन चालू असलेली भातपिकाची लावणी वाहून गेली. तर यानंतर आलेली वादळे व आता सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे कापणी योग्य झालेले भातपिक जमिनीवर कोसळुन त्याला पुन्हा नव्याने अंकुर आले आहेत. यामुळे भातपिकाची नासाडी झाली आहे. त्याचबरोबर भात पिकातून गुरांना चाऱ्याच्या स्वरूपात मिळणारे गवत देखील कुजून गेले. सतत चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. याकडे आ.वैभव नाईक यांनी ना.दादा भुसे यांचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याकरिता भातपिक नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहेत. तरी पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागास देण्यात यावेत. अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.त्यावर ना.दादा भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!