कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुंदे तलाठी कार्यालयाचे उद्घाटन..

▪️येत्या काही महिन्यात कुंदे गावाला कायमस्वरूपी तलाठी दिला जाणार; आ.वैभव नाईक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.१४: कुंदे गावच्या ग्रामस्थांची अनेक वर्षाच्या तलाठी सजा मागणी आता पूर्ण होत आहे. शासनाच्या अनेक योजना तसेच या गावातील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आता तलाठी कार्यालयाची स्थापना होत आहे. कोणत्याही कागदपत्रांची गरज भासल्यास ग्रामस्थांना पाच ते सहा किलोमीटर अंतर कसाल येथे जावे लागत होते. मात्र, ही अडचण आता सुटणार आहे. येत्या काही महिन्यात कुंदे गावाला कायमस्वरूपी तलाठी दिला जाणार आहे. असे आज कुंदे गावातील तलाठी कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी आमदार नाईक म्हणाले, या नवीन तलाठी कार्यालयात स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहोत तोपर्यंत आठवड्यातून दोन दिवस कसाल चे तलाठी संतोष बांदेकर ग्रामस्थांच्या मदतीला उपलब्ध राहणार आहेत कुडाळ तालुक्यात नव्याने २३ तलाठी सजा कार्यालय झाली असून ४ महसूल मंडळांची निर्मिती करण्यात आली आहेत. आता जिल्ह्यात नवीन ५९ तलाठी सजा कार्यालय झाली आहेत तर ४ नव्याने महसुली मंडल कार्यालयाचे उद्घाटन झाले असल्याचे आमदारा वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम म्हणाले, या गावी १९५५ सालापुर्वी (तलाठी) सजा कार्यालय कार्यान्वित होते. मात्र, काही काळानंतर ते आंब्रड, पोखरण असे फिरत कसाल गावी गेले. त्यामुळे कसाल, कुंदे गावाला एकच तलाठी सजा कार्यालय असल्याने कुंदे गावाच्या ग्रामस्थांना सर्व प्रशासकीय कागदपत्रांची अडचणी येत असत, तसेच प्रशासनाच्या कोणत्याही योजनांंची माहिती या गावाला उशिरा पोहोचत होत्या त्यामुळे आता कुंदेगावाच्या ५५/६० वर्षाच्या नंतर मागणी पूर्ण होत असून शासकीय कागद पत्रांच्या भेडसावणारे अडचणी आता सुटणार आहेत. आता या गावच्या जनतेची परवड होणार नाही. हक्काचे तलाठी कार्यालय मिळणार आहे. असे सरपंच यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक, पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, मंडलाधिकारी मंगेश हंगे, तलाठी संतोष बांदेकर, सरपंच सचिन कदम, उपसरपंच सुशील परब, ग्रामसेवक रामचंद्र वनकर, पोलीस पाटील समीक्षा परब, तंटामुक्त अध्यक्ष रमेश परब, संजय गांधी निराधार योजना कमिटी सदस्य प्रवीण भोगटे, शिवसेना उपतालुका प्रमुख महेश सावंत, आंंब्रड विभाग प्रमुख विकास राऊळ, छोटू पारकर तसेच महेश परब, कल्पिता मुंज, ज्ञानदेव राणे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्याकडे आंंब्रड गावच्या ग्रामस्थांनी यावर्षी अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या भात शेतीच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी याकरिता निवेदन सादर केले. यावेळी आमदारांकडे आपल्या व्यथा मांडल्या.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!