कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची मागणी आहे-खा, विनायक राऊत*

*_🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची मागणी आहे-खा, विनायक राऊत*

*_🛑विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या पदराआडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन दर्शन घेतले*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी,दि,:-१९ऑगस्ट*
पर्यटन स्थळावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची मागणी आहे असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या पदराआडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन दर्शन घेतले असे खासदार राऊत यांनी सांगितले.
आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयांमध्ये शिवसेना पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शहरप्रमुख नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर व पदाधिकारी उपस्थित होते
खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरू व्हावीत ही मागणी रास्त आहे त्याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे तसेच पर्यटन स्थळावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे.सागरी, डोंगरी पर्यटनाला चालना मिळावी अशी आमची भूमिका आहे. माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी निर्माण केलेला चांदा ते बांदा मधील पर्यटन पॅटर्न योजना चालना मिळावी म्हणून देखील आमचे प्रयत्न आहेत

खासदार राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी जाऊन दर्शन घेतले आता महाविकासआघाडी हलचल माजेल असे बोलले जात आहे त्यावर खासदार राऊत म्हणाले, नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेने महाविकास आघाडीत हलचल माजणार नाही तो त्यांचा भ्रम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकार पाच वर्ष कार्यकाल पूर्ण करेल आणि पुढील पाच वर्ष देखील महा विकास आघाडीची सत्ता येईल.
खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने प्रचंड महागाई ,पेट्रोल डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांची आंदोलने, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाचशे शेतकऱ्यांच्या मृत्यू तसेच सरकारी मालमत्ता विकण्याचे केंद्र सरकारने धोरण ठेवले आहे त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे त्यामुळे भाजपा विरुद्ध जनतेत खदखद आहे.
माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचे दर्शन घेण्यासाठी स्मृतीत स्थळी जातात त्यांच्या पदराआडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दर्शन घेतले आहे. देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना शिवसैनिक अडवणार नाही हे माहीत असल्याने तो फायदा राणे यांना झाला आहे मात्र शिवसैनिक किंवा बाळासाहेब ठाकरे राणे यांना माफ करणार नाही असे ते म्हणाले.
खासदार राऊत म्हणाले,भाजपाचे प्रमोद जठार यांनी केलेली टीका निरर्थक असून ते जिल्ह्यातील दलाल आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मृतिस्थळाच्या भेटीनंतर जी टीका आणि भाकिते वर्तविली जात आहेत त्याचा काहीही फायदा होणार नाही नारायण राणे यांनी स्मृतिस्थळावर पदराआडून दर्शन घेतले आहे. बाळासाहेब यांचा त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. उलट बाळासाहेबांचे असा कृतघ्न माणूस पुन्हा महाराष्ट्रात जन्माला येऊ नये असे आशीर्वाद असतील.
खासदार राऊत म्हणाले,भाजपा आणि त्यांच्या नेत्यांना मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकार कोसळेल आणि आपले सरकार येईल असे स्वप्न पडत आहे पण ते होणार नाही. राणे यांच्यामुळे महाविकासआघाडीला फरक पडणार नाही मात्र फडणवीस यांना राणे यांच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे दीड लाख मरावेत अशी इच्छा भाजपा आणि केंद्र सरकारची असावी त्यामुळे त्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी नवीन मंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली आहे. राणे यांच्यासह मंत्र्यांनी देशासमोर कोरोनाचे भयंकर संकट असताना, महागाई,पुरस्थिती, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असताना जन आशीर्वाद यात्रा काढली हे चुकीचे आहे. नवीन मंत्री मुखदर्शन दाखविण्यासाठी निघाले आहेत.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!