आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईल – खासदार विनायक राऊत

🛑 कालव्याचे काम जलद गतीने होण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी : दि. १९

माडखोल लघुपाटबंधारे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी होईल. या कालव्याची कामे जलदगतीने व्हावीत म्हणून अधिकाऱ्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

माडखोल येथील पाणी वापर संस्था सदस्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी खासदार विनायक राऊत आणि आमदार दिपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत माडखोल धरणाची पाहणी केली.

यावेळी माडखोल ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली यावर खासदार राऊत यांनी लवकरच याबाबत अधीक्षक अभियंता समवेत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.

माडखोल लघुपाटबंधारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी या आंदोलनाची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याने ह्या ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले होते.

मात्र आज खासदार विनायक राऊत यांनी माडखोल येथील धरणावर प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांकडून माहिती घेतली यावेळी ग्रामस्थांनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात झालेले भ्रष्टाचार तसेच निकृष्ट काम त्याबाबत हकीगत खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच या धरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना बिल अदा करण्यात आल्याने सखोल चौकशीची मागणी केली.

यावेळी पाणी वाटप सहकारी संस्थेचे निवडणुकीचा आदेश केल्याबद्दल त्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली असता कोरोनामुळे जग थांबलेले असताना पाणीवापर सहकारी संस्थेची निवडणूक कशी काय घेतली जाते. तात्काळ त्याला स्थगिती देण्यात यावी, असे निर्देश खासदार राऊत यांनी दिले.

यावेळी ग्रामस्थ राजकुमार राऊळ, सूर्यकांत राऊळ, जी.जी. राऊळ, देविदास राऊळ, सत्यवान राऊळ, अशोक लातये, संतोष राणे, आनंद राऊळ, कृष्णा राणे, विजय राऊळ, तसेच शिवसेना महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवासेनाधिकारी सागर नाणोसकर, शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, जि.प. सदस्य राजेंद्र मुळीक, मायकल डिसोजा, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, एकनाथ नारोजी, योगेश नाईक, संदीप माळकर, विजय राऊळ, श्री.मुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी लघु पाटबंधारे प्रकल्प अधिकारी यांनी खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांच्यासमोर माहिती ठेवली.

*👇जाहिरात👇*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचा श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रह – २०२१ प्रकाशित होणार आहे.*

*या आरती संग्रहमध्ये ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची आहे, त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा 👇…*

*कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव*
*📲 – 9422515714*

*🔥👉 टिप : श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रहासाठी जाहिरात द्यायची असल्यास, २०/०८/२०२१ पुर्वी द्यावी. हि विनंती.🙏🔥*

==========•••••••••==========

*आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.

तसेच इतर १०० मिळुन ६८० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

तरी आपण आपल्या छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवस जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनेल *✍️कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव* यांच्याशी संपर्क साधा.

*📲मोबाईल नंबर : 9422515714*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*👇सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇*

👇 जाहिरात 👇

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!