कोकणराजकीयसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

जलेल्या गांजलेल्या,दिन दलीतांचा, जनसामान्यांचा ‘पुंडलिक दळवी*

*🛑भक्तांसाठी कठेवर हात घेऊन विठेवर उभ्या असलेल्या पंढरीच्या विठुरायाचा, भक्त पुंडलिक, सावंतवाडीत राष्ट्रवादीचा किमयागार*

*🛑रंजलेल्या गांजलेल्या,दिन दलीतांचा, जनसामान्यांचा ‘पुंडलिक दळवी*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ संपादकीय: सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- :-१८ऑगस्ट*
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जणावा..ज्याने गरीबी कशी असते हे अनुभवले असते,त्यालाच गरीबांचे दुःख कळते,गरीबीचे चटके कसे असतात हे माहिती असते, व अशाच व्यक्तीला गरीबांचा पुळका येतो,प्रसंगी तो त्याच्यासाठी देव बणून उभा राहतो,गरीब कुटूंबात जन्माला आलेला, कष्ट, मेहनत , प्रामाणिक पणा,पडेल ते काम करण्याची तयारी,मोडेन पण वाकणार नाही हा बाणा, आणि चिकाटीच्या जोरावर सावंतवाडी शहरातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या नावाचा ठसा उमटवणारा,व यशाच्या शिखरावर वाटचाल करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुंडलिक दळवी.
हाॅटेल व्यवसाय सांभाळत समाजिक सेवेत वाहून घेणारा पुंडलीक आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून स्वत:ला समाजसेवेत झोकून दिले गेली १० ते १५ वर्ष ते सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, क्षेत्रात कार्यरत आहेत.सामाजिक कार्य करत असताना त्यांच्या मेव्हुणी राष्ट्रवादी पक्षाच्या पुण्याच्या पदाधिकारी अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला, सुरवातीला राष्ट्रवादी व्यापार उद्योग सेल चे जिल्हाध्यक्ष व काही महिन्यातच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशी उतुंग भरारी पुंडलीक याने मारली.
ज्या राष्ट्रवादी पक्षाची धुरा घ्यायला कोण तयार नव्हते अशा कठीण काळात पवार घराण्यावर विश्वास ठेऊन अर्चनाताई घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादीच घड्याळ हाती बांधल. व पदाला शोभेचे बाहुले न बनवता त्याला न्याय दिला व राष्ट्रवादी शहरात, तालुक्यात दिसू लागली,युवकांची फौज गोळा झाली, शिवाजी महाराजांच्या रणनिती प्रमाणे शंभर मावळ्यांचे कधी हजार मावळे झाले ते कळलेच नाही, सावंतवाडी नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक जाहिर झाली व या निवडणुकीत पुंडलीक दळवी यांचे नाव पुढे आले मात्र, महाविकास आघाडीचा धर्म पाळत, पक्षादेश मानत त्यांनी मोठ्या मनाने निवडणूकीतून माघार घेतली.
पुंडलीक दळवी यांचे एकच स्वप्न रसावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीला नंबर वन बनवायचे,त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी,पक्ष कार्यात झोकून देऊन जुणे, नवे, असा भेदभाव न करता सर्वांना एकत्र केले, पक्ष प्रवाहात सामील केले,व पक्ष संघटना बळकट केली.
आपल्या पदाच्या माध्यमातून गोर गरीब ,रंजलेल्या ,गांजलेल्या ,दीन, दलीत त्रस्त जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मनापासून काम केले,. विरोधकांना गाफील ठेवत पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम घेतले , विरोधक बिथरले, दुसऱ्या दिवशी असे घडलेच नाही असे सांगण्यासाठी दबाव आणला जाऊ लागला व हे धक्के पचवणे वीरोधकांना कठीण होऊ लागले,. सत्तेत असून देखील प्रसंगी जनतेसाठी ते रस्त्यावर उतरले.गरीबांना न्याय दिला अन्यायाला त्यांनी थारा दिला नाही. त्यामुळेचं पुंडलिक दळवी हे सर्वसामन्यांना हक्काचे, आपल्या घरातील माणूस वाटू लागला, नव्हे तर तो घरातील माणूस झाला,
महिलांचीही फळी निर्माण झाली व ती त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासोबत पुंडलीक यांनी सिंहाचा वाटा उचलला.
कोरोना काळात रस्त्यावर उतरून गरीबांना मदत केली या सामाजिक कार्याबरोबरच गरजू लोकांचे आधार म्हणून ते उभे राहिले. पक्ष नेतृत्वाला आपल्या कार्यकर्तृत्ववान त्यांनी प्रभावित केल. कोकणात आलेल्या पूरस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या कोकणवासियांना त्यांनी धीर दिला.
तौक्ते वादळ, अतिवृष्टीनंतर थेट मैदानात उतरत त्यांनी जनतेला मदत केली. जनतेच्या भावना जाणून घेत सरकारच्या माध्यमातून मदत देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.जीथे कमी तीथे आम्ही असे म्हणत जिथे प्रशासन पण पोहचले नाही तीथे पुंडलीक पोहचला,म्हणूनच संकट काळात धावून येणारा ‘पुंडलिक’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या जीवनप्रवासात आई जानकी दळवी, मेहूणी अर्चना घारे- परब, पत्नी पुजा दळवी, ज्येष्ठ बंधू धोंडी दळवी, वहिनी सारीका, मेहुणा विनायक परब, पुतणे प्रसाद, अमोल, मुलगी श्रीया, मुलगा भुवन यांची मोलाची साथ लाभली.
एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा कोणतेही राजकीय वलय पाठीमागे नसताना आपल्या स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठतो व आपल्या नावाचे प्रामाणिक वलय निर्माण करतो अशा या पुंडलीकास कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_🎉🎊🎂राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष,खरोखर कठीण प्रसंगात जनतेला साथ देणारे,धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते *मा.श्नी.पुंडलिकजी दळवी* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…._

*💐शुभेच्छूक:-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!