कोकम भाव वधारले कोकम लागवड शेती म्हणून करणे गरजेचे
*🛑कोकमला हमीभाव आवश्यक तोक्ते वादळामुळे फळांचे नुकसान झाल्याचा परिणाम*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि- :-१८ऑगस्ट*
कोकणातील कोकम सोलाना महाराष्ट्रात तसेच परदेशात मोठी मागणी आहे कोकम सोल तर आमसूल या नावाने प्रसिद्ध आहे मात्र यंदा झालेल्या तोक्ते वादळामुळे कोकम फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे या वर्षी कोकम सोल तसेच कोकम सरबत, कोकम आगळ आधी कोकम उत्पादनाचे भाव वधारले आहेत . सिंधुदुर्ग जिल्हात आंबा-काजू पाठोपाठ कोकम उत्पादन महत्त्वाचे असते . मात्र कोकम उत्पादनांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी कोकम उत्पादने व्यापारी तत्त्वावर तयार करण्यासाठी तयार नाहीत . जिल्ह्यात ९० टक्के कोकम उत्पादन हे नैसर्गिकरीत्या होते . सर्व साधारणपणे एप्रिल महिन्यात पासून कोकमाची फळे तयार होऊ लागतात मे महिन्याच्या शेवटी कोकम फळे पिकण्याचा बहर असतो . या कोकम फळापासून कोकम सोल , कोकम सरबत, आगळ आदी उत्पादने येथील शेतकरी घरोघरी बनवितात . मात्र या वर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या वादळामुळे कोकमची कच्ची फळे जमिनीवर पडून वाया गेली तर झाडावर शिल्लक राहिलेली फळे सततच्या पावसामुळे कुजून गेली सामाजिक प्रक्रियेसाठी पुरेशा प्रमाणात कोकम मिळाले नाही त्यामुळे या वर्षी कोकम सोल, कोकम सरबत, व आगळाचे उत्पादन घटले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंबा, काजू ,नारळ ,केळी, याप्रमाणेच कोकमच्या संकरित प्रजातीची लागवड करणे आवश्यक आहे. कोकम पिकापासून निर्मित विविध उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोकम शेती निश्चितच फायद्याची ठरू शकते. साहजिक उत्पादनाचे भाव या वर्षी चांगले वधारणार आहेत .यामुळे शासनाने कोकम उत्पादनासाठी हमीभाव देण्याची गरज आहे .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_🎉🎊🎂राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष,खरोखर कठीण प्रसंगात जनतेला साथ देणारे,धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते *मा.श्नी.पुंडलिकजी दळवी* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…._
*💐शुभेच्छूक:-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

