दारू तस्करांनी‌ ४० टक्के शासनाचा महसूल बुडवला म्हणून आयकर विभागाने जप्तीची कारवाई करावी

*🛑दारू तस्करांनी‌ ४० टक्के शासनाचा महसूल बुडवला म्हणून आयकर विभागाने जप्तीची कारवाई करावी*

*🛑उत्पादन शुल्क विभाग आपला महसूल बुडवला म्हणून कारवाई करते तशी आयकर विभागाने आपला ४० टक्के व्हॅट बुडवला म्हणून कारवाई करावी*

*🛑 पकडलेल्या दारू तील अल्कोहोलचे प्रमाण तपासून त्या दारू तस्करां विरूध्द कठोर कारवाई होणे गरजेचे*

*🛑दारू तस्कर पुरवठा करणारे मध्य मध्येच असते की विष ते पोलिसांनी,राज्य उत्पादन शुल्क विभागाने करावे जाहिर*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी,१४ जुन-*
गोव्यातून जी विषारी दारू अवैध मार्गाने सिंधुदुर्गात आणली जाते व सिंधुदुर्गाचे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, ती दारू पकडून तिचे मूल्यमापन करतात व महाराष्ट्र शासनाचा कर चुकवला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो, त्याच पद्धतीने त्या पकडलेल्या दारूच्या एकूण रक्कमेवर ४०% व्हॅट चुकवला म्हणून सेल्स टॅक्स विभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल करून आपला कर वसूल करावा,व आतापर्यंत जेवढ्या दारू तस्करांना पकडून करोडो रुपयाची दारू जप्त केली आहे ती सर्व प्रकरणे सेल टॅक्स विभागाने आपल्याकडे वर्ग करून संबंधितांनी महाराष्ट्र शासनाचा चाळीस टक्के व्हॅट चुकवला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तो सर्व कर जमा करून घ्यावा अशी मागणी आम्ही राज्य आयकर विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे करणार आहोत.
. अशा प्रकारची कारवाई झाली तर यापुढे दारु तस्कर चोरटी वाहतूक करण्यास धजावणार नाही असे आमचे मत आहे,गेल्या तीन वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने सुमारे दहा कोटीची अवैद्य दारू पकडली आहे, त्या दहा कोटी वर चाळीस टक्के प्रमाणे व्हॅट बुडवला म्हणून संबंधित दारू तस्करांकडून तो वसूल करून घ्यावा किंवा संबंधितांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करावी, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आम्ही करणार असून गोरगरीब जनतेला व्यसनाला लावून, स्वस्त दारुचे आमीष दाखवून ,व्यसन करण्यास भाग पाडणाऱ्या व नंतर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दारू तस्करांना सळो की पळो करून सोडल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, महाराष्ट्रात जी अधिकृत परवानाधारक मध्य विक्रीची दुकाने आहेत त्यांच्याकडून परवाना नुतनीकरण करताना आयकर विभागाचा टॅक्स भरल्याशिवाय परवान्याचे नूतनीकरण होत नाही मग ज्या अवैद्य दारू च्या गाड्या उत्पादन शुल्क विभाग पकडते त्या गाड्यांच्या अवैद्य दारू च्या एकूण रक्कमेवर जो ४० टक्के व्हॅट होतो तो भरल्याशिवाय संबंधित गाड्या कशा सोडल्या जातात याचा तपास होणे गरजेचे आहे.
म्हणून आयकर विभागाने ही सर्व माहिती उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडून घेऊन संबंधितां विरुद्ध कडक कारवाई करावी व संबंधितांकडून हा कर वसूल करण्यात यावा अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे करणार आहोत.
कायद्यातील तरतुदी तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीने शासनाचा महसूल बुडवला तर त्या एकूण रकमेवर जो ४०% व्हॅट असतो तो ही भरणे गरजेचे असते, तो कर भरला नाही तर संबंधितांवर, त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होऊ शकते ,म्हणून अशी प्रकरणे शोधून काढून संबंधित दारू तस्करांकडून हा सर्व कर वसूल करण्यात यावा अशी कायद्याला धरुन,कायद्यातील तरतुदीनुसार आम्ही मागणी करणार आहोत.
पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क जी अवैद्य दारू पकडतात त्या पकडलेल्या दारूमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती इतर घटकांचे प्रमाण किती याचे मूल्यमापन करण्यासाठी ती सीलबंद बाटली लॅब मध्ये पाठवणे गरजेचे असते व संबंधित दारुचा अहवाल आल्यानंतर त्या दारु मध्ये प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण असेल तर ते विषात गणले जाते म्हणून अशा दारू विक्रेत्यां विरुद्ध कडक कलमे लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते व कायद्यात तशी तरतूद आहे, मात्र सर्व संबंधित अधिकारी अशा प्रकारची तसदी घ्यायला बघत नाही, व येथेच दारू तस्करांचे फावते या अधिकाऱ्यांना मोठा हप्ता असल्याने हे अधिकारी दारु तस्करांना पाठीशी घालतात ,यामध्ये सर्वसामान्य जनता बळी पडते ,अनेकांचे संसार उघड्यावर पडतात ,ही विषारी दारू पिणारी व्यक्ती एक वर्षीही जगू शकत नाही,वर्षभरात अनेकांचे मृत्यू झालेले आम्ही याची डोळा पाहिले आहेत, एका विशिष्ट व्यक्तीच्या बारमध्ये गेलेली व्यक्ती वर्षभरानंतर पुन्हा दिसणार नाही याची खात्री आहे, म्हणजे त्या बारमध्ये दारू नाही तर विष पाजले जाते यालाच स्लो पाॅयझन म्हणतात,दारू पिणारी व्यक्ती झुरून झुरून मरते व त्या व्यक्तीच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम संबंधित मध्य विक्रेते व अधिकारी करतात असा आमचा थेट आरोप आहे.
एखादा अधिकारी चांगले काम करत असेल तर त्याची बदली करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र येतात व त्या अधिकाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवतात हा गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे,मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल खंबीर पणे उभा आहे याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देत आहोत.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!