गतवर्षीच्या भरपाईपासून पाडलोस मधील शेतकरी अद्याप वंचित..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.१४: गतवर्षी ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भरपाई मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या परंतु हमीपत्राचे कारण पुढे करत प्रशासनाने बाजू मारून नेण्याचे काम केले. तरीही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन वेळा हमीपत्रे देऊनही नुकसान भरपाई जमा न झाल्याने वंचित शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पाडलोस गावातील सुमारे ११४ शेतकऱ्यांच्या भातपीक व फळपीकांचे ३ लाख ८९ हजार २८० रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळणार असे सांगून प्रशासनाकडून केवळ कादगपत्रांचा खेळ सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिझवल्या. परंतु काही शेतकरी सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही कवडी जमा झाली नसल्याचे भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

ऑगस्ट-ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कापणी योग्य झालेले भातपीक जमीनदोस्त झाले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी व महसूल विभागाने त्यावेळीच पिकांचे पंचनामे देखील केले. मात्र, एक वर्षाचा कालावधी पूर्णत्वास आला तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तीन वेळा हमीपत्र घेऊनही अद्याप भरपाई मिळाली नसल्यामुळे प्रशासनाने भरपाईचे आमिष दाखवून आम्हा शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे, पाडलोस ग्रा.पं. माजी सदस्य तथा शेतकरी नंदा गावडे यांनी सांगितले.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!