क्राइमराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी..

▪️मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांची तालुक्याच्या वतीने पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१३: शहरासोबतच सावंतवाडी तालुक्यात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत दारु धंदे, मटका, जुगार, गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालु आहे. सावंतवाडी मळगाव येथील महिलेच्या झालेल्या खुनात दोषी आढळलेल्या आरोपी दोन नंबर धंद्याशी निगडित आहेत. आधीच कोरोना काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढलेली आहे. तरुणांमध्ये निराशा आहे. आज अनेक भागात गोवा बनावटीची दारू विक्री व अनधिकृत वाहतूक होत आहे. यामुळे तरुण वर्ग नाहक व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. कुटुंबे उध्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या पोलिस स्थानकाच्या अखत्यारीत येत असणार्‍या अनधिकृत दारु धंदे, गोवा दारू, मटका, जुगार, अनधिकृत गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावेत. अशी मागणी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे तालुक्याच्या वतीने निवेदनद्वारे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास या निवेदनाद्वारे कळवु इच्छीतो, वरील दिलेले सर्व अनधिकृत धंदे बंद करण्यात यावेत. अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढावा लागेल. उद्भवणार्‍या परिस्थितीस आपणच जबाबदार असाल असे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी मनसे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने निवेदनात नमुद केले आहे.

यावेळी उपस्थित ऍड. अनिल केसरकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार कुरतडकर, शहर उपाध्यक्ष शुभम सावंत, देवेंद्र कदम, आकाश परब आदी उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!