नुकसान झालेल्या भातशेतीचे ताबडतोब पंचनामे करावेत..

▪️मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांची तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या कडे निवेदनद्वारे मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१३: जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि भूस्खलने तसेच क्यार’ नावाच्या वादळी व अवकाळी पावसामुळे आणि आत्ता पुन्हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यातील सरासरी ७० टक्के भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे, काही भागांत हि नुकसानी ९० टक्के पर्यंत पोहोचली आहे. येत्या दि.१५ नोव्हेंबर पर्यंत योग्य ते पंचनामे करून भरपाई द्यावी. अशी मागणी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

श्री. सुभेदार निवेदन म्हणतात कि, भाताच्या लोंब्या चिखलात आडव्या पडल्यामुळे शेतातच या धान्यास कोंब फुटले आहेत. शेतीच्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. सावंतवाडीतील काही गावात भात खाचरांमध्ये डोंगरांतील माती,झाड-झाडोरा वाहून आला आहे. कापणी झाली तरी भात सुकवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे.पुढच्या वर्षी गुरांच्या वैरणीचा प्रश्न उद्भवणार आहे. यावर्षी आतापर्यंत मालवण तालुक्यात सरासरी ४००० ते ४५०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दिनांक १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार (महसूल व वनविभाग, सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म -३) केंद्र शासनाच्या निकषाच्या धर्तीवर (SDRF/NDRF) नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्तींना सन २०१५ ते २०२० या दरम्यान २ हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली पिक नुकसानी ३३ टक्के किंवा ३३ टक्के पेक्षा अधिक असेल तरच नुकसान भरपाई (सरकारी भाषेत निविष्ठा अनुदान) दिले जाते. खरीप (भात) क्षेत्रासाठी जास्तीत जास्त (रु. २७७८/एकर) एवढी तुटपुंजी आहे. म्हणजेच गुंठ्याला ₹७० मिळतील. एवढी तुटपुंजी मदत देऊन भात उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा करू नये.

भात पिक लागवडीस प्रत्यक्ष खर्च रु. ७९२ प्रती गुंठा एवढा येतो. प्रती गुंठ्याला सरासरी ६२ किलो भात पिकते. १० किलो भातापासून सरासरी ६ किलो तांदूळ मिळतो. भाताचा सरकारी दर रु. १८५० प्रती क्विटल आहे. उत्पादित केलेला माल बाजारात विकल्यास गुंठ्याला सरासरी ११४७ रुपये शेतकऱ्याला मिळतात. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे निकष तत्काळ बदलून सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

यासाठी सरसकट पंचनामे करावेत. नुकसान भरपाईची रक्कम सरसकट लागवड क्षेत्रानुसार द्यावी. आवश्यकता वाटल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. त्यासाठी ड्रोन्स, रिमोट सेन्सिंग सर्व्हे, व सॅटेलाइट सर्वे यांचा वापर करून जिल्ह्यातील भात पिकाची नुकसानी काही दिवसांत पूर्ण होऊ शकते.

तरी आमच्या या मागणीचा सहानुभूतीने विचार होवून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देवून आर्थिक हातभार शासनाकडून द्यावा अशी नम्रपणे विनंती शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी पत्राद्वारे केली आहे.

यावेळी उपस्थित ऍड. अनिल केसरकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार कुरतडकर, शहर उपाध्यक्ष शुभम सावंत, देवेंद्र कदम, आकाश परब आदी उपस्थित होते.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!