चिपळूण वासीयांसाठी श्री सदस्य बनले स्वच्छता दूत
*_🛑३१०६ सदस्यांनी १५६७ टन कचरा उचलून केली शहराची साफ सफाई*
*_🛑डाॅ.श नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी स्वच्छतेचा राबविला आदर्श उपक्रम*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-ओंकार रेळेकर*
*🎴 चिपळूण,दि,:-७ऑगस्ट*
चिपळूण शहरामध्ये आलेल्या महापुरात सर्वत्र चिखल आणि घाणीचे सामराज्य पसरले होते. या काळात डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चिपळूण वासीयांच्या मदतीला धावून आले आहे. प्रतिष्ठान ने स्वच्छता मोहिमेत चिपळूण वासियांसाठी स्वच्छता दूत बनून अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे,या मोहिमेचे मुंबई,ठाणे,नवी मुंबई येथील महानगर पालिकेच्या चिपळूणात आलेल्या आयुक्त आणि अधिकारी वर्गाने विशेष कौतुक केले आहे.
———————————————————
*दि*.२७ जुलै ते ३० जुलै तसेच दि.४ आणि ५ ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या एकूण ३१०६ श्री सदस्यांनी १५६७ टन कचरा उचलला यात डंपर ६०,जेसीबी ५, ट्रॅक्टर ३४ वापरण्यात आले.स्वच्छता मोहिमेत चिपळूण शहरातील विविध विभागात स.९ ते साय.५ वा.पर्यंत अगदी नियोजनबद्ध पद्धतीने श्री सदस्य साफ सफाई करीत होते.समर्थ बैठकीतून संपूर्ण जगाला आध्यात्मिक मार्गाने शांततेचा संदेश देणारे स्वर्गीय डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पुढे सुरू असलेल्या डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी,रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात आलेल्या पुरात झालेल्या चिखल
दलदल,कचऱ्याचे ढीग याची साफसफाई करून स्वच्छतेची मोहीम २७ ते ३० जुलै आणि बुधवारी, गुरुवारी सकाळी कोकणातील ३१०६ श्री सदस्यानी हाती घेतली.
चिपळूण तालुक्यात दि. २२ जुलै रोजी अचानक आलेल्या महापुरात शहर आणि अनेक गावातील नागरिकांचे मोठे हाल झाले, व्यापारी बांधवांचे झालेले अतोनात नुकसान आणि ग्रामीण भाग ,नदीलगतच्या गावांमधील शेकडो घरे उद्वस्थ झाली होती या प्रलयंकारी संकटात चिपळूण बाजारपेठेत सर्वत्र घाणीचे,
कचऱ्याचे साम्राज्य ,दुर्गंधी पसरली होती. या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाणारी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. अशावेळी पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या आज्ञेने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा. जि. रायगड यांच्या वतीने कोकणातुन पोलादपूर,खेड,रोहा,कोलाड,
पाली,बोरिवली,दादर,ठाणे,
शहापूर,पुणे,भोर ,इंदापूर,म्हसळा,श्रीवर्धन,महाबळेश्वर,सातारा, सांगली, पाटण,नागोठणे,लवेल,आसनगाव,विरार,भिवंडी,कापसाळ, अंबरनाथ,गुहागर,आगवे,सती येथील श्री सदस्यांनी चिपळूण वासियांकरिता स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छता देवदूत बनून महत्वपूर्ण योगदान दिले आहे.बुधवारी सकाळी ९ वा. सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेची सुरवात शहरातील पेठमाप,परीट आळी, सोनार आळी, बुरटे आळी, तरे आळी, मुरादपूर,मिठागरी मोहल्ला,शंकर वाडी,भारत स्वामील,इंडियन जिम,
बाजारपेठ,खाटीक आळी, ग्रीन पार्क बायपास,बहादूरशेख नाका ते चिंचनाका,भेंडीनाका
येथून झाली. सर्वच श्री सदस्य चिपळूणमधील जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग तसेच पसरलेली दुर्गंधीयुक्त धान्य,सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली दलदल साफ करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले दिसून आले.यावेळी श्री सदस्यांनी बुधवार आणि गुरुवारी एकूण ५३३ टन कचरा उचलल्याने शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिक यांना मदतीचा मोठा हात मिळाला तर सर्वांनी
समाधान व्यक्त केले.मागील काही दिवस प्रशासनाने कचरा उचलण्याचे काम हाती घेऊनही बाजारात ठीक ठिकाणी
कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते.यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन एक हजारहून अधिक श्री सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.सोबतच रोगप्रतिबंधक फवारणी केली
स्वतःच्या जेवणासह स्वखर्चाने सर्व सदस्य मोहिमेत उत्स्फूर्तपणे
सहभागी झाले होते. डंपर ,जेसीबी मशीन ,टॅक्टर घेऊन कचरा ,चिखल,साफ करण्याचे काम सर्वत्र सुरू होते.तसेच शहरातील आणि उपनगरातील सर्व ठिकाणचा कचरा उचलून असंख्य डंपर मधून शिवाजी नगर कचरा प्रकल्प येथे टाकण्यास पाठविला जात होता.
चिपळूण मध्ये बुधवारी आणि गुरुवारी राबविण्यात आलेल्या या स्वच्छतेच्या मोहिमे बाबत चिपळूण शहरातील व्यापारी,आणि नागरिकांनी पद्मश्री डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी धर्माधिकारी यांच्या शिकवणी बद्दल आदर व्यक्त करून समाधान व्यक्त करीत श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांचे आभार मानले आहेत.या पूर्वीही २०१९ मध्ये सांगली,
कोल्हापूर,कोकण विभाग येथे आलेल्या महापुरात श्री सदस्यांनी मोठे स्वच्छतेचे सेवाकार्य केले होते,शिवाय केरळ येथे आलेल्या महाप्रलंयकारी पुराच्या संकटात यथोचित आर्थिक सहकार्यही करण्यात आले होते.खास मुंबई,नवी मुंबई,ठाणे येथून आलेल्या आयुक्त आणि अधिकारी वर्गाने स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*