पूरग्रस्त सभासदांना कमी व्याजदराने कर्ज मिळणार चिपळूण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा महत्वाकांक्षी निर्णय
पूरग्रस्त सभासदांना कमी व्याजदराने कर्ज मिळणार चिपळूण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा महत्वाकांक्षी निर्णय*
चिपळूण (ओंकार रेळेकर) : आधी कोरोनाचे संकट आणि आता त्यात २२ जुलै रोजी आलेला महाप्रलंयकारी पूर यात सर्वसामान्य माणूस खूप अडचणीत आला असून अशा प्रसंगात चिपळूण नागरी पतसंस्था सर्वसामान्य पूरग्रस्त सभासद असणाऱ्या नागरिकांच्या मदतीला धावून आली आहे.चिपळूण नागरी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे मार्फत पुरग्रस्तांना प्रचलीत व्याजदरापेक्षा कमी व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली.गेल्या आठवडयातील अतीवृष्टीमुळे चिपळूण, खेड, संगमेश्वर , राजापूर सह जिल्हयामधील अन्य तालुक्यात व्यापारी, लहान मोठे उद्योजक तसेच वाहन धारक, सर्वसामान्यांना मोठया आसमानी संकटाचा फटका बसला आहे . चिपळूण शहरातील परिसरातील सर्व भाग मोठया प्रमाणावर पूर क्षेत्राखाली आला आहे . या सर्वाना मदतीचा हात देण्यासाठी चिपळूण नागरी पतसंस्था आपल्या ” आपली माणसे , आपली संस्था ” हया ब्रीद वाक्याला साजेसे असे सामाजीक बांधीलकी जपण्याची परंपरा कायम ठेवून एक वेगळा ठसा समाजामध्ये निर्माण करणार आहे . नैसर्गिक आलेल्या हया संकटात चिपळूण शहरातील तसेच जिल्हयामधील हया आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या संस्थेच्या सभासदांना संस्थेमार्फत अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात येणार आहे . यासाठी संस्थेच्या कर्मचा – यांनी एक दिवसाच्या पगाराची रक्कम बाजुला काढून संस्थेच्या माध्यमातुन हे वाटप करण्यात येणार आहे. याअगोदर संस्थेने ” मुख्यंमत्री सहाय्यता निधी ” ला कोरोना काळात १ कोटीची मदत तसेच संस्थेच्या कर्मचा – यांनी ४ लाखाची भरघोस रक्कम दिली आहे . तसेच ऑगस्ट २०१ ९ ला कोल्हापूर जिल्हया मधील आलेल्या पुरामध्ये पुरग्रस्त झालेल्या आंबेगाव या गावाला संस्थेच्या कर्मचा – यांनी आपल्या दोन दिवसाच्या पगारामधुन जिवनावश्यक वस्तुची मदत केली होती . माहे ऑगस्ट २०१ ९ रोजी महाराष्ट्र राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील पीडीत बांधवांना आर्थिक मदतीची शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ” मुख्यंमत्री सहाय्यता निधी ” ला रक्कम रु .१० लाखाचा धनादेश अदा करणेत आला . हया मधुन संस्थेने वेळोवेळी आपली सामाजीक बांधीलकीची जाणीव ठेवुन काम केले आहे, अशी माहिती अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली आहे . सर्व पुरग्रस्त सभासदांना आवाहन करण्यात येते आहे की या सर्व योजनांच्या माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेमध्ये किंवा संस्थेच्या प्रधान कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

