वडाळातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने चिपळूणातील नुकसानग्रस्त नागरिकांना केली मदत
चिपळूण (ओंकार रेळेकर):- महापुरात संपूर्ण संसार उध्वस्त झालेल्या चिपळूण मधील असंख्य कुटुंबासाठी वडाळा मुंबई येथील तरुणांनी अनोखी मदत करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.या तरुणांनी एकत्र येत आपल्या नोकरी मधून आणि छोट्या मोठ्या कामातून मिळविलेल्या पैशातून घरगुती वस्तू खरेदी करून पूरग्रस्तांना मदत म्हणूंन दिल्या .
या बाबत अधिक माहिती अशी की वडाळा शिवसेना शाखाप्रमुख श्री. रुपेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाने महाड व चिपळुणातील पूरग्रस्तांना धान्य, कपडे, पाणी बॉटल्स व शैक्षणिक साहित्याच्या कीटचे वाटप करुन मदतीचा हात दिला आहे. गरजवंतांपर्यंत ही मदत पोहोचविण्यासाठी त्यांना चिपळुणातील सामाजित कार्यकर्त भूषण कांबळी यांचे विशेष सहकार्य लाभले. वडाळा शिवसेना शाखाप्रमुख श्री. रुपेश मोहिते
यांच्यासह आकाश पाथरे, प्रशांत कोटकर, महेश खेडेकर, निखिल भडवळकर, तेजस कस्पले, अमित मोहिते, सतीश मोहिते, प्रथमेश गुरव, अनंत गुरव, रवी
जाधव, विश्वास देवरुखकर, योगेश भोईर, सुरज तांबे, साहिल पवार, सोशल मीडिया शाखा समन्वयक अनिकेत कदम,तानाजी कारंडे, संतोष जाधव आदींनी मुंबई येथून महाड वचिपळुणातील पूरग्रस्तांसाठी मदत आणून त्याचे वाटप केले.या तरुणांनी केलेल्या या विशेष मदातकार्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त करीत आभार व्यक्त केले आहेत.
फोटो : पूरग्रस्त लोकांना मदत करतांना रुपेश मोहिते,भूषण कांबळे आणि मित्रमंडळ छायाचित्रात दिसत आहेत.(छाया : ओंकार रेळेकर)

