▪️लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीला प्रांतापालांची अधिकृत भेट संपन्न
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण:* लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेला दिनांक १९ फेब्रुवारी रोजी प्रांत ३२३४ डी १ चे प्रांतपाल आदरणीय लायन अण्णासाहेब गळतगे यांची अधिकृत भेट हॉटेल वनश्री येथे उत्साहात संपन्न झाली. ला अण्णासाहेब गळतगे हे प्रांतातील जेष्ठ लायन असून ते अण्णासाहेब गळतगे ब्लड बँके गडहिंग्लजचे संस्थापक आहेत.
लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी हा २९ वर्ष लायनेस म्हणून अनुभव असलेला मात्र नव्याने लायन म्हणून प्रस्थापित झालेला फक्त महिलांचा क्लब असूनही या क्लब चे सेवाकार्य व प्रशासकीय कार्य प्रांतामध्ये उल्लेखनीय असल्याने प्रांतापालांनी क्लब चे विशेष कौतुक केले. लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी हा उत्तम कार्यासाठी प्रांतामध्ये टॉप १० क्लब मध्ये नोंदला गेला असून त्याचे कौतुक उपस्थित सर्वांकडून केले गेले.
यावेळी प्रांतापालांनी लायनेस माजी प्रांताध्यक्षा, आताच्या लायनेस मल्टिपल सेक्रेटरी तसेच लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीच्या क्लब अडमिनिस्ट्रेटर ला. प्रांजल गुंजोटे यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब अतिशय योग्य दिशेने वाटचाल करत आहे असे गौरवोद्गार काढले.
यावेळी रिजन चेअरमन ला नितीन गांधी उपस्थित होते, त्यांनीही क्लब च्या कार्याचे कौतुक केले.
क्लब अध्यक्षा ला एकता मुळ्ये यांनी वर्षाच्या सुरवातीपासूनच कोविडच्या वैश्विक महामारीच्या वातावरणातही क्लबच्या सर्व सदस्यांनी ऑनलाईन माध्यमातून तसेच शक्य झाले तेव्हा स्वतः हजर राहून सेवाकार्याना खंड पडू न देता कसे काम चालू राहिले यावर प्रकाशझोत टाकला. क्लब सचिवा ला डॉ शमीना परकार यांनी सचिव अहवाल, तसेच कोषाध्यक्षा ला संतोषी रतावा यांनी कोषाध्यक्ष अहवालामधून सेवाकार्य व खर्चाचा मेळ उत्तम प्रकारे सादर केला.
गरजेच्या ठिकाणी पोहचून सेवाकार्य करणे हे लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीचे वैशिष्ट्य असून त्याला अनुसरून यावेळीही क्लब ने प्रांतापालांच्या हस्ते
श्री हुमणे यांच्या मुलाच्या यकृत शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत
श्रीमती फिरजाना या गरजू भगिनीला उदरनिर्वाहासाठी शिलाई मशिन भेट दिली. तसेच बुलेटिन चेअरमन ला अंजली कदम यांच्या समर्पित या त्रैमासिक बुलेटिन चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ला एकता मुळ्ये, ला शमीना परकार, ला संतोषी रतावा, ला प्रांजल गुंजोटे व ला चेतना होमकर यांना विशिष्ट पिन ने सन्मानित करण्यात आले.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रांतापालांची सुरेख ओळख ला प्रांजल गुंजोटे यांनी सभागृहाला करून दिली, सूत्रसंचालन ला श्रुती सावर्डेकर यांनी केले तर आभार ला स्वाती देवळेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कॅबिनेट सेक्रेटरी ला राजेंद्र वडगुळे, ट्रेझरर ला सुनील पट्टणशेट्टी, ला रश्मी सावर्डेकर, ला गौरी रेळेकर, ला सीमा चाळके, ला तेजल पेंढाम्बकर, ला तमीज मुल्ला, ला अनिता नारकर, ला रंजना कदम तसेच सर्व मेंबर उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

