आपत्कालीनकोकण

गाळेल मध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या युवकाचा शोध युद्ध पातळीवर सुरु…

गाळेल मध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या युवकाचा शोध युद्ध पातळीवर .
ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात येणार आहे.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
गाळेल येथील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या युवकाचा शोध गुरुवारी सहाव्या दिवशीही सुरूच आहे. पाच पोक लँड मशीनच काम सुरू आहे.तो युवक लवकरात लवकर मिळण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे.मातीत अडकलेल्या त्या युवकाचा आता ड्रोन च्या सहाय्याने शोध घेण्यात येणार आहे. कालच दीपक केसरकर यांनी त्या घटनास्थळाला भेट दिली होती.यावेळी तो युवक मिळेपर्यंत शोध सुरू ठेवण्यासाठी सांगितले होते.युवा नेते आ.नितेश राणे यांनीही गाळेल येथे घटनास्थळी जात प्रशासनाच्या शोध मोहिमेचा आढावा घेतला.त्या युवकाचे नातेवाईक देखील ठाणमांडून बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!