कोकण

जिवाची बाजी लावून पुरात एस टी ची साडेसात लाखाची रोकड सांभाळणाऱ्या रणजित राजेशिर्के यांचा नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी केला सत्कार

*⭕🔹जिवाची बाजी लावून पुरात एस टी ची साडेसात लाखाची रोकड सांभाळणाऱ्या रणजित राजेशिर्के यांचा नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी केला सत्कार*

*◾रणजित राजेशिर्के यांच्यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्याचा सार्थ अभिमान : सुहास राजेशिर्के*

चिपळूण (ओंकार रेळेकर) आपल्या जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळाची साडेसात लाखाची रोकड सुखरूप ठेऊन स्वतःसह अन्य सात जणांचा जीव वाचविणाऱ्या आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांची कामगिरी खरोखर उल्लेखनीय आहे.सरकारी सेवेत राजेशिर्के यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . अशा शब्दात सातारा नगर पालिकेकचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी कौतुक केले.खास सातारा येथून सुहास राजेशिर्के बुधवारी चिपळूण येथे रणजित राजेशिर्के यांचा सत्कार करणे आणि पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्याकरिता चिपळूण दौऱ्यावर आले होते.
दि.२२ जुलै रोजी आलेल्या महापुरात आपल्या जिवाजी पर्वा न करता एस टी महामंडळाची सुमारे साडेसात लाखांची रोकड तब्बल ९ तास एस टी च्या टपावर घेऊन बसून मालमत्ता सुरक्षित ठेवल्या बद्दल चिपळूण आगाराचे आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांचा सातारा नगर पालिकेचे नगरसेवक तथा वेहेळे गावचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांनी बुधवारी चिपळूण आगारप्रमुख कार्यालयात जाहीर सत्कार केला.या वेळी श्री रणजित चंद्रकांत राजेशिर्के आगार व्यवस्थापक रा.प.चिपळूण
श्री संजय केशव रसाळ वाहन परीक्षक श्री संजय पुंडलिक मोहिते वाहतूक नियंत्रक.
श्री सचिन साळवी सुरक्षा रक्षक
श्री गणेश पंडीत वाहक
श्री शशिकांत पांडुरंग भोजने चालक श्री भगवान यशवंत गोटमुकले चालक यांचाही सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.२२ जुलै रोजी चिपळूणमध्ये दाणादाण उडवलेल्या पावसात चिपळूण एसटी डेपो पाण्याखाली गेला होता. मात्र याच पावसाच्या पाण्यात तब्बल ९ तास एसटीच्या टपावर बसून, डेपो प्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी डेपोची रोकड वाचवली! तब्बल साडेसात लाख रुपये घेऊन डेपो मॅनेजर आणि त्यांचे सात सहकारी फक्त ‘उभ्या पावसात’ नाही तर ‘उभ्या-आडव्या’ झोडपणाऱ्या पावसात ९ तास एसटीच्या छतावर बसले होते शिवाय आगाराच्या आवारात असलेल्या ऑइल च्या ड्रम मधील ऑइल पाण्यात तरंगत असतांना पाण्यातून मार्ग काढत असतांना या सर्वजांणानी एसटीचे टफ गाठले रणजित राजेशिर्के यांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरावर कौतुक होत असून बुधवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अनिल परब यांनीही त्यांचा सत्कार केला.रणजित राजेशिर्के यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण सदैव असल्याचे सुहास राजेशिर्के यांनी या वेळी बोलतांना सांगितले.सतीश राजेशिर्के,दिगदेश राजेशिर्के,मंदार राजेशिर्के आणि चिपळूण आगारातील कारमाचारी वर्ग उपस्थित होते.रणजित राजेशिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सुहास राजेशिर्के यांनी केलेल्या विशेष सत्काराने कर्मचारी भारावून गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!