कोकणशासकीयशैक्षणिक

प्रलंबित असलेले अंगणवाड्या चे काम तात्काळ मार्गी लावा…

जिल्हा परिषद चे बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचे संबंधित विभागाला तात्काळ काम मार्गी लावण्याचेआदेश

प्रतिनिधी सुनील आचरेकर

मालवण

मालवण तालुक्यातील किलोऀस गावामधील गावठण व बौद्धवाडी या दोन अंगणवाड्या मंजूर होत्या सदर अंगणवाड्या छप्परवीना पावसात भिजत असल्यामुळे वेळोवेळी ग्रामपंचायतीला सांगुन देखील दखल न घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन उफऀ बाळा लाड यांनी आवाज उठवलेला होता. त्या संदर्भात बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व या कामा संदर्भात असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या व होणारी गैरसोय दुर करुन काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले या वेळी उपस्थित उपसभापती राजु परुळेकर, शाखा अभियंता पाडगावकर, सरपंच सावंत, ग्रामसेवक रावले, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन उफऀ बाळा लाड ग्रा. सदस्य भास्कर लाड, उपसरपंच किलोऀसकर,प्रविण घाडीगावकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!