पोलीस घटनास्थळी रवाना; आत्महत्या की अपघात, अद्याप स्पष्ट नाही…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि २९ मळगाव रेल्वे ड्रायव्हर अज्ञात योगाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित गृहस्थाचा शरीर धिन्ह – छिन्ह झाले असल्यामुळे ओळख पटू शकली नाही. मात्र वस्तुस्थिती जन्य पुराव्यावरून त्याने आत्महत्या केली असावी अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
रेल्वेची धडक बसल्यामुळे मळगाव येथे अज्ञाताचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती, की संबंधिताचे शरीर छिन्न – विच्छिन्न झाले आहे. हा प्रकार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत, असे ठाणे अंमलदार दीपक लोंढे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधिताचा मृतदेह छिन्न – विछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. हा प्रकार तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना व पोलिसांना संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

