तेरेखोल नदीतील माडखोल-धवडकी पात्रातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा….
तेरेखोल नदीतील माडखोल- धवडकी या पात्रातील गाळ काढण्यासाठी माडखोल ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले.
23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरेखोल नदी काठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. मेटवाडी,वरकोंडवाडी,धवडकी येथील 100 हून अधिक घरामध्ये व दुकानांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी भरले होते घर सामान,धान्य तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बरेच नुकसान झाले, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच माडखोल धवडकी येथील वृंदावन नर्सरी या ठिकाणी प्रदीप शिरसाट यांच्या घराशेजारील ओहोळा वरील अतिक्रमण काढून पाणी पुन्हा नदीला मिळवणे , माडखोल धवडकी फूल ते मेटवाडी पर्यंत गाळ काढणे, माडखोल सातोळी पुलाच्या कामामुळे नदीपात्रात असणारे दगड हटवणे, अत्यावश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे,आदी गोष्टी निवेदनात नमूद करण्यात आल्या. यावेळी विजय राऊळ, सिद्धेश शिरसाट, सागर येडगे,जयप्रकाश मडगावकर ,राजन नाईक आदी उपस्थित होते .

