भुईबावडा,कोळपे व उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघांत शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न
*वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा,कोळपे व उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघांत शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान अंतर्गत बैठका पार पडल्या
वैभववाडी प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. शिवसंपर्क अभियानांर्गत मतदारसंघात मध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्येक गावात शिवसेना पक्ष संघटना आपल्याला अजून बळकट करायची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकजुटीने शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे.जनतेच्या अडीअडचणींना धावून जाणारा म्हणून शिवसैनिकांची ख्याती आहे. त्यादृष्टीने अधिक जोमाने काम करावे असे आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे ,तालुका प्रमुख मंगेश लोके,युवासेना जि. सरचिटणीस स्वप्नील धुरी, विभाग प्रमुख कोळपे जि.प. जितेंद्र तळेकर , विठोजी पाटील, उपविभाग प्रमुख गौस पाटणकर, सोशल मिडिया ता प्रमुख-विठोबा गुरव, महेश रावराणे,प्रथमेश तळेकर , आदींसह शिवसैनिक, महिला आघाडी उपस्थितीत होते.

