कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा व धवडकी पूरग्रस्त सलून व्यवसायिकांना मदतीचा एक हात पुढे

सलून ,ब्युटी पार्लर असोसिएशन मुंबई यांच्याकडून . सलून व्यवसायाशी संबंधित वस्तूंचे किट वाटप करण्यात आले

माडखोल-
दि. 23 . जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका येथील बांदा,धवडकी येथे मोठी पुरस्थिती निर्माण झाली होती, त्या पूरामुळे बांदा येथील १९ तर धवडकी येथील २ असे एकूण २१ सलून व्यवसायिकांचे अतोनात नुकसान झाले .
त्या व्यवसायिकांना आधार मिळावा म्हणून सावंतवाडी तालुका नाभिक संघटना अध्यक्ष ऍड वैभव चव्हाण तसेच कुडाळ तालुका अध्यक्ष आनंद पिंगुळकर ,संतोष यादव व सलून ब्युटी पार्लर असोशिएशन सदस्य संदीप चव्हाण यांच्या माध्यमातून सलुन ,ब्युटी पार्लर असोशिएशन मुंबई यांच्याकडून सलून व्यवसायिकांना सलून व्यवसायाशी संबंधित वस्तूचे किट वाटप करण्याचे ठरले त्यानुसार बुधवार दिनांक २५ .८ .२१रोजी बांदा येथे किट चे वाटप करण्यात आले,
यावेळी सलुन ब्युटी पार्लर असोसिएशन संस्थापक दत्तात्रय चव्हाण सलुन ब्युटी पार्लर असोसिएशन अध्यक्ष प्रसाद चव्हाण महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना सरचिटणीस राजन पवार नाभिक जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष एडवोकेट वैभव चव्हाण तसेच जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण ज्येष्ठ सल्लागार सुभाष चव्हाण शांताराम वेतोरे कर संतोष यादव सदानंद पवार सदानंद होडवडेकर रोशन चव्हाण प्रकाश चव्हाण विजय वेंगुरलेकर शानू शेरलेकर शुभम शेरलेकर संतोष बांदेकर व इतर नाभिक बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!