कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसूमध्ये ग्रामस्थ अवैध्द दारू विक्री च्या विरोधात एकवटले…….,अवैध्य दारू विक्रेत्यांना यापुढे गावात दारू विक्री करायला कायमची बंदी…….पून्हा दारूविक्री करताना आढळल्यास तडीपारीची कारवाई -पोलिस प्रशासन.

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🌄देवसू, दि२४जुलै- :-गेल्या चार पाच वर्षापासून देवसू गावामध्ये अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. अक्षरश: सतरा-अठरा वर्षांची मुले व्यसनाधीनतेकडे वळली होती. आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा देवसू मध्ये दारू खरेदी साठी गर्दी करत होते. सदर दारूविक्रेत्यांना वेळोवेळी समज देऊन सुद्धा त्यांची दारू विक्री राजरोसपणे सुरु होती ग्रामस्थांनी अनेक वेळा पोलिसांना याबाबत लेखी तक्रारी केल्या मात्र ज्यावेळी पोलीस छापा मारत होते त्यावेळेस या दारु विक्रेत्यांकडे कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल सापडत नसल्यामुळे पोलीस देखील असमर्थ होते.मात्र गावातील तरुण पिढी या व्यसनापाई बरबाद होत असल्याचे लक्षात येताच तसेच व्यसनाधीन होऊन छोट्या-मोठ्या चोऱ्या करणे भांडण करणे असे प्रकार वाढीस लागल्याने घरोघरी कुटुंबामध्ये कलह निर्माण होते. या सगळ्याला कंटाळून शेवटी देवसू मधील सर्व ग्रामस्थ एकत्र येत सदर दारू विक्रेत्यांना देवसू शाळेजवळ बोलावून घेतले तसेच पोलीस प्रशासनाला याची खबर देताच सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील सहाय्यक निरीक्षक डुमिंग डिसोजा आंबोली पोलिस स्टेशनचे हवालदार दत्तात्रय देसाई त्वरित हजर झाले त्यांच्यासमोर गावकऱ्यांनी दारू विक्रेत्यांच्या तक्रारीचा पाढाच वाचला तसेच महिलांनी देखील दारूपायी कुटुंबातील कलह पोलिसांसमोर व्यक्त केले. तसेच यापुढे पुन्हा दारूविक्री सूरु झाल्यास पोलिस प्रशासन जबाबदार राहील,असे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच ग्रामस्थांनी या दारू विक्रेत्यांकडून यापुढे गावात कुठल्या प्रकारची दारू विक्री करणार नाही असे लेखी स्वरूपात लिहून घेतले शेवटी गामस्थांच्या पुढे या दारू विक्रेत्यांना नमते घेऊन पुन्हा दारू विक्री करणार नाही हे गावासमोर मान्य करावे लागले. तसेच पोलिसांनी देखील या विक्रेत्यांना पुन्हा दारूविक्री करताना आढळल्यास प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने तडिपारीची कारवाई करण्यात येईल अशी कडक समज दिली. तसेच गावच्या ग्रामस्थांच्या जागृकते बद्दल समाधान व्यक्त केले ग्रामस्थांनी देखील पोलिसांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.या वेळी देवसू ओवळिये पारपोली गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!