गोवा सरकारच्या कडक निर्बंधांमुळे नोकरी वाचविण्यासाठी आड मार्गाने जाणारा युवक दरडीत अडकल्याची भिती…..
आता तरी गोवा सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन कामगारांना दिलासा द्यावा
प्रासंगिक कोकण
ब्युरो चीफ:-विशाल पित्रे
नोकरीनिमित्त सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्या कामगारांना कोरोना तपासणी अहवाल बंधनकारक केल्यामुळे काही युवक आपली नोकरी वाचविण्यासाठी आडमार्गाने म्हणजेच कळणे गाळेल मार्गे म्हापसा असा प्रवास करतात, असाच प्रवास करत असताना गाळेल मधील दरड कोसळण्याची घटना घडत असताना गोव्यात कामाला जाणारा तो युवक त्या दरडीच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे,
सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०% युवक युवती गोवा राज्यात नोकरीनिमित्त जात येत असतात.कोरोना सारख्या महामारीमुळे पहिल्या लाटेत झालेल्या लाँकडाऊनमुळे गोव्यात जाणाऱ्या अनेक युवक युवतीच्या नोकऱ्या नामुष्की ने सोडाव्या लागल्या होत्या तर काही कंपन्या ने नोकरीवर हजर होत नसतील तर नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता त्यामध्ये अनेकजण बेरोजगार झाले होते.त्यातून हळूहळू हळूहळू सावरत असताना कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा कडक लाँकडाऊन महाराष्ट्र व गोवा राज्याने जाहीर केले.पुन्हा एकदा दररोज गोव्यात नोकरीनिमित्त कामाला ये-जा करणाऱ्या मुलांची तारांबळ उडाली होती.त्यात असे नियम लागू करण्यात आले की गोवा राज्यात किंवा महाराष्ट्र राज्यात प्रवेश करायचा असेल तर आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट हवा मात्र दररोज कामाला जाणारी मुले कुठे कोरोना तपासणी करुन अहवाल मिळवणार??खरोखरच ह्यामध्ये सर्वसामान्य मुलांचे मोठे हाल झाले होते..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले की नोकरीनिमित्त जाणाऱ्या मुलांचे हाल होत आहेत गोव्यातून सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या मुलांना त्या निर्बंध मधून सुट द्या त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर नोकरी निमित्ताने गोव्यात जाणाऱ्या मुलांसाठी सुट देण्यात आली.मात्र गोवा प्रशासनाने अजून कोणतीच सुट नोकरीला जाणाऱ्या मुलांना दिली नाही आहे,ही वस्तुस्थिती आहे मात्र गोव्यात महाराष्ट्र मधून येणारी भाजीपाला, दुध,ट्रान्सपोर्ट,गौणखनिज,फुले वाहतूक करणाऱ्यांना कोणत्याही टेस्ट शिवाय त्यांना प्रवेश मिळतो मग रोजीरोटी साठी जाणाऱ्या मुलांनाच का निर्बंध गोवा सरकार ने ठेवलेत हा प्रश्न निर्माण होत आहे. गोवा सरकार सरळ मार्गाने कामानिमित्त जाणाऱ्या मुलांना गोव्यात घेत नसल्याने अनेक मुले स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी किंवा स्वतः चे पोट भरण्यासाठी आडमार्गाने किंवा चोरवाटेने गोव्यात प्रवेश करत आहेत हे गोवा प्रशासनाला सुद्धा माहीत असेल मात्र तरीही कोणतीच दखल गोवा प्रशासनाने घेतले नाही अनेक मुले आपल्या गाड्या बाँर्डर वर ठेऊन कामाला जातात खरोखरच स्वतः ची नोकरी वाचवण्यासाठी काय काय करावे लागते हे त्या दररोज गोवा मध्ये कामाला जाणाऱ्या मुलांनाच कळत आहे.शुक्रवारी डिंगणे-गाळेल मार्गावर डोंगर खचल्याचा प्रकार घडला आणि त्या आडमार्गाने तो युवक गोवा राज्यात कामाला जात होता.त्या घटनेत निश्पाप गोवा मध्ये कामाला जाणारा सिंधुदुर्गातील युवक त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे त्याला शोधण्याची शोध मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे,त्या युवकावर काळाने घाला घातला.खरोखरच गोवा सरकारचे मुख्यमंत्री डाँ.प्रमोद सावंत यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अनेक सिंधुदुर्ग मधील मुले गोवा राज्यात स्वतःचे पोट भरण्यासाठी आडमार्गाने येत आहे स्वतःचे जीव धोक्यात घालून कामाला जात आहे.सध्या कोरोनाची संख्या पण कमी होत आहे निदान कामाला येणाऱ्या मुलांसाठी तरी योग्य त्या अटी नियम तयार करुन त्या मुलांसाठी निर्बंध शिथील करावे अशी मागणी नोकरी साठी जाणाऱ्या मुलांकडून होत आहे.
सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर तसेच जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनीसुद्धा गोव्याचे मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष वेधून कामाला जाणाऱ्या मुलांसाठी निर्बंध शिथील करुन देण्यासाठी प्रयत्न करावे.तसेच गोवा राज्यात भाजपचे सरकार आहे तरीही सिंधुदुर्ग मधील भाजपच्या नेत्यांनी सुद्धा याबाबत लक्ष घाला आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करा आपल्या जिल्ह्यातील मुलांना प्रवेश द्यावा म्हणून अन्यथा पावसाळ्याचे दिवस आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून मुल कामाला जाणार आणि कधीतरी असा जीव गमवावा लागू शकतो त्याची जवाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे…

