आमदार दीपक केसरकर यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे राजकारणाची पातळी खालवत चालल्याची लक्षणे
*🛑आमदार ते मंत्री पदापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले स्वच्छ व्यक्तीमत्व म्हणजे आमदार दिपक केसरक*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय:-*सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-११*
दीपक केसरकर हे सावंतवाडीतील सज्जन, सालस, व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र परिचित आहेत, त्यांच्या याच गुणाने ते सलग तीन वेळा या मतदारसंघाचे आमदार झालेत, काही जणांनी त्यावेळी जावईशोध लावला होता, या मतदार संघाच्या इतिहासात सलग तीन वेळा कोण आमदार म्हणून निवडून आले नाहीत मात्र दीपक केसरकर यांनी ही परंपरा खंडित केली,ती त्यांच्या याच स्वभावाचा जीवावर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोटरी क्लब चे कार्यकर्ते ह्या पासून मी त्यांना जवळून पाहत आलो केसरकर यांच्यावर आजतागायत भ्रष्टाचाराचा एकही आरोप कोणी करू शकलं नाही त्यामागे त्यांचे विचार , घरात झालेले संस्कार,हे कारणीभूत असावे असे माझे मत आहे, त्यामुळे केसरकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर ते सावंतवाडी वासियांनाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना पटणार नाहीत हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे.
या मतदारसंघाचे आमदार होण्या अगोदर केसरकर यांची संपत्ती जी होती ती आमदार झाल्यानंतर त्यात घट होत गेली, खरं तर एखाद्या माणूस आमदार, मंत्रिपदावर गेला ,की त्याची संपत्ती चौपट वाढते केसरकर यांच्या बाबतीत मात्र तसे झाले नाही, आपली असलेली प्रॉपर्टी विकून त्यांनी काही काळ राजकारण केले हा त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचा एक भाग आहे,त्यामुळे अशा माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना राजकारणापलीकडे जाऊन आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन ते केले गेले पाहिजेत.
दिपक केसरकर पालकमंत्री,गृहराज्यमंत्री , वित्त मंत्री, ही मोठमोठी पदे असतानासुद्धा त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही अशा माणसावर जेव्हा राजकारणातून भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात त्यावेळी तो माणूस पेटून उठतो ,तेच कैसरकारांचे झाले व संजू परब यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केलेत, परब कुटुंबियांशी आपले घरगुती संबंध आहे असे सांगणाऱ्या केसरकर यांना संजू परब यांनी केलेल्या आरोपांमुळे दुःख झाले व कधी कठोर न लागणारे केसरकर यांनी संजू परब यांना कठोर शब्दात इशारा दिला,खरे तर पालकमंत्र्यांनी एखादा निधी नगरपालिकेकडे दिला की तो कशा प्रकारे वापरला जातो हे पाहणे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे ते पालकमंत्र्यांचे काम नाही मात्र त्या कामावरून केसरकर यांना टारगेट करून त्यांच्यावर आरोप करणे सावंतवाडीच्या संस्कृतीला धरून नाही असे आमचे मत आहे,
म्हटले जाते दीपक केसरकर हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले घरात वडिलांचा पिढीजात व्यवसाय ,रोटरी क्लब च्या माध्यमातून सामाजिक सेवेत केसरकर आलेत व पुढे केसरकर यांचा यशाचा आलेख उंचावत गेला,काही काळ,त्यांना शांत बसावे लागले तरी श्रद्धा व सबुरी या साई-बाबांच्या शिकवणीनुसार केसरकर यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली व त्यात त्यांना यश मिळत गेले.
पालकमंत्री असताना कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही , चांदा ते बांदा योजना सिंधुदुर्गात चांगल्याप्रकारे राबवून त्यांचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला, हे शेतकरी आजही खासगीत बोलताना सांगतात, एवढे चांगले काम करूनही त्यांच्याकडून मंत्रीपद काढून घेतले गेले हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधीच रुचले नाही
केसरकर यांनी आपल्या पदाचा कारकिर्दीत कोणाचा मोठा व्यक्तिगत फायदा केला नसता तरी सर्वसामान्य जनता व्यापारी उद्योग आले असतील त्यांचे नुकसानही कधी केले नाही,हीच केसरकर यांची जमेची बाजू आहे.
श्रीदेव पाटेकर यांच्या पवित्र भूमीत जे लीनतेने वागले ते उच्च पदापर्यंत पोहचले व ज्यांनी अती केले ते सगळे संपले हा इतिहास आहे, त्यामुळे सावंतवाडीत एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप काम करताना आपल्या बुद्धीला स्मरून मी जे बोलतो ते खरोखरच खर आहे का याचा विचार करूनच आरोप केले तर भविष्यातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही एवढे मात्र निश्चित.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*