कसाल स्टँड समोरील ब्रिज खाली सर्व्हिस रोडवर लगत खड्ड्यांचे साम्राज्य

*कसाल स्टँड समोरील ब्रिज खाली सर्व्हिस रोडवर लगत खड्ड्यांचे साम्राज्य*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*कसाल*

कसाल स्टँड समोरील ब्रिज जवळ कुडाळहून कणकवली कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. उपलब्ध सर्व्हिस रोड लगत खड्ड्यात साचलेले चिखलयुक्त पाणी साचल्याने येथून प्रवास करताना अनेक समस्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे याकडे महामार्ग प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या सर्व्हिस रोडवरून नागरिकांना पायपीट करावी लागते या खड्डेमय रस्तेमधून दुचाकी ,तीनचाकी, चारचाकी वाहने जात असल्याने खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. याशिवाय या सर्व्हिस रोडवर रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या सर्व्हिस रोडची डागडुजी करण्याची मागणी वाहन चालक पादचारी नागरिकांमधून केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!