बांदा आळवाडी बाजारपेठेत व मच्छी मार्केट रस्त्यावर पाणी;कट्टा कॉर्नर ते आळवाडी मार्ग ठप्प…
बांदा आळवाडी बाजारपेठेत व मच्छी मार्केट रस्त्यावर पाणी;कट्टा कॉर्नर ते आळवाडी मार्ग ठप्प…
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बांदा दशक्रोशीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.तेरेखोल नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तेरेखोल नदी परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.बांदा येथील तेरेखोल नदीतील पाणी पत्राबाहेर आल्याने हे पाणी नेहमीप्रमाणे नजीक असणाऱ्या आळवाडी बाजारपेठेत घुसले आहे.बांदा एसटी बसस्थानक मागच्या भागात तीन तुळशी याठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
त्याचप्रमाणे बांदा तुळसान पुलानजिक असलेल्या शेती बागायतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेती पुर्णतः पाण्याखाली गेली आहे.तर बांदा निमजगा पाटो पूल तसेच वाफोली बांदा पाटकर बागेजवळ असलेल्या कॉजवे पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना व वाहतूक बंद ठेवण्यात आली. याठिकाणी असणाऱ्या लक्ष्मी विष्णू अपार्टमेंटमध्ये पाणी घुसल्याने तळमजला पाण्याखाली गेला आहे.एकंदर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.