हायवेला पडलेले खड्डे देतात अपघातास निमंत्रण…
*हायवेला पडलेले खड्डे देतात अपघातास निमंत्रण…*
*संबंधित खड्डे तात्काळ बुजवावे “वी फाॅर यू” संस्थेची मागणी*
सावंतवाडी,दि.१८:- सावंतवाडी-बांदा मार्गावर आरटीओ चेकपोस्ट समोर सुमारे ६ फूट रुंद व २ फूट खोलीचे २ धोकादायक खड्डे चुकीच्या नियोजन व कामामुळे निर्माण झालेले आहेत. रात्रीच्या काळोखात सदरचे खड्डे हे अजूनच धोकादायक बनतात. दि. १७/०७/२०२१ च्या रात्री सुमारे ७ ते ८ गाड्या त्या खड्याच्या भक्षस्थळी पडून गाड्यांचे नुकसान झालेले आहे. तसेच सदरच्या खड्यामुळे त्या रस्त्यावरून जाणाच्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तरी कोणताही मोठा अपघात होण्याआधी यात लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी असे निवेदन “वी फाॅर यू” संस्थेने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी “वी फाॅर यू” संस्थेचे अध्यक्ष ॲड. संकेत नेवगी, सचिव ॲड.स्वप्निल कोलगांवकर, सहसचिव अमेय महाजन,खजिनदार मिहीर मोंडकर,सदस्या ॲड.सायली चव्हाण, सुमित मळीक आदी उपस्थित होते.
यावेळी संबंधित समस्येचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणात लक्ष घालून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले. तसेच संबंधित प्रकार नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या निदर्शनास आणून देणार,असेही ते म्हणाले.