चिपी विमानतळात स्थानिक युवकांना रोजगार द्या-युवासेनेची मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा प्रस्तावित चिपी विमानतळ येथे विमानतळ अधिकारी यांची भेट घेऊन स्थानिक भुमिपुत्र तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना याठिकाणी विविध विभागांत नोकरी उपलब्ध व्हाव्यात आणि साठी ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी निवेदनाद्वारे मागणी युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली यावेळी युवासेना जिल्हाअधिकारी श्री मंदार शिरसाट, युवासेना उपजिल्हाधिकारी श्री सागर नाणोसकर, वेंगुर्ला युवासेना अधिकारी पंकज शिरसाट, उपतालुका अधिकारी दादा सारंग, उपतालुका अधिकारी रोहित पडवळ, युवासेना म्हापण विभाग अधिकारी विजय घोलेकर, युवासेना रोहित म्हापणकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.