वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावची कन्या निधी अभय ठाकुर हीचे गोवा दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश, मिळविले ९८.१६% गुण*..
_*🛑वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावची कन्या निधी अभय ठाकुर हीचे गोवा दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश, मिळविले ९८.१६% गुण*..
*🛑म्हापण सरपंच अभय ठाकुर यांची ती सुकन्या, म्हापण गावातून होत आहे निधी वर शुभेच्छांचा वर्षाव*..
*🛑अभ्यासा बरोबर कला क्रीडा क्षेत्रात सुद्धा आहे निधी पारंगत, २ वर्षांपूर्वी शालेय उपक्रमा अंतर्गत साधले होते पंतप्रधान मोदींशी ऑनलाईन संभाषण*.. _
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*
*🎴 वेंगुर्ला दि- :-*
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावची कन्या निधी अभय ठाकुर हीचे गोवा दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश, मिळविले ९८.१६% गुण..
म्हापण सरपंच अभय ठाकुर यांची ती सुकन्या, म्हापण गावातून होत आहे निधी वर शुभेच्छांचा वर्षाव..
अभ्यासा बरोबर कला क्रीडा क्षेत्रात सुद्धा आहे निधी पारंगत, २ वर्षांपूर्वी शालेय उपक्रमा अंतर्गत साधले होते पंतप्रधान मोदींशी ऑनलाईन संभाषण..
समीर चव्हाण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावची कन्या व म्हापण सरपंच अभय ठाकूर यांची सुकन्या कुमारी “निधी अभय ठाकूर” हिने गोवा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपले व आपल्या आई-वडिल, गाव, तालुका, जिल्हाची मान अभिमानाने उंचावली आहे. तीने ९८.१६% गुण मिळवून इतिहास घडवला आहे. तीने पहिलीपासून दहावीपर्यंत सर्वंच इयत्ता मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
निधी हि लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहेच पण त्याच बरोबर कला क्रीडा क्षेत्रात सुद्धा तीची कामगिरी जबरदस्त आहे. तीला गायनाची आवड असून ती उत्तम गाते सुद्धा. ती सद्या शास्त्रीय संगीत शिकत आहे. गोवा राज्यस्तरीय गायन स्पर्धेत तीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचप्रमाणे पोहण्यातही ती तरबेज आहे इयत्ता चौथी मध्ये असताना तीने पोहण्याच्या स्पर्धेत मांडवी नदी पोहून पार केली होती.
इयत्ता आठवी मध्ये असताना ‘अटल थींकींग लॅब’ या शालेय उपक्रमा अंतर्गत तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ऑनलाईन संभाषण साधले होते व सर्वांची वाहवा मिळवली होती. ‘अनघा वाचा सुंदर’ प्रतिष्ठानने निधीला “प्रज्ञावंत विद्यार्थीनी” म्हणून सन्मानित केले आहे.
भविष्यात तिला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे आहे. सध्या ती डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल कुजीरा बांबूळी गोवा येथे शिकत आहे.
तीच्या या घवघवीत यशानंतर तीचे वडील म्हापण गावचे सरपंच अभय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “आई-वडील म्हणून आम्हाला तीचा सार्थ अभिमान आहे. ती एक गुणी व प्रचंड बुद्धिमत्ता असलेली मुलगी आहे. अशी सर्वगुणसंपन्न मुलगी आमच्या पोटी जन्माला आली हे आमचे भाग्य व ईश्वराचे आशिर्वाद मानतो. तीची पुढील वाटचालसुद्धा अशाप्रकारेच दैदिप्यमान ठरावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तीला सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकवर्ग, संस्थेचे आभार मानतो” असे म्हणाले.
आपल्या बुद्धीमत्तेच्या बळावर सिंधुदुर्गाची ही लाडकी लेक “निधी” आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने गोवा राज्य गाजवत आहे व सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या तीच्या घवघवीत यशाबद्दल म्हापण गावातून नीधीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे व तीच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तीचे भविष्य उज्वल आहे व भविष्यात ती असे अनेक अभिमानानचे क्षण आपल्या आईवडिलांना व म्हापण वासीयांना देईल यात काही शंका नाही.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_💐सावंतवाडी ग्राहक संरक्षण कक्षाचे उपशहरप्रमुख तथा जिमखाना मित्रमंडळ ग्रुपचे अध्यक्ष *मा.अजित सांगेलकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💐_
*●शुभेच्छूक●*
_सावंतवाडी शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच अजित सांगेलकर मित्रमंडळ, सावंतवाडी_
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*