वेंगुर्ल्यातील युवा गायक तेजस मेस्त्रीचा “सुर संगीत महोत्सवात” होणार सन्मान
*▪️युवा पुरस्कारासाठी निवड; पुण्यातील मित्रगोत्री परिवार व मनहर संगीत सभा यांचे आयोजन*.
*🖥️ Kokan Live Breaking News
*▪️प्रतिनिधी-शुभम वैद्य*
*▪️वेंगुर्ले*
पुणे येथील मित्रगोत्री परिवार व मनहर संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या सुर-सरिता संगीत महोत्सवात दिला जाणारा यावर्षीचा कै.मोरेश्वर यशवंत कुलकर्णी स्मृती “युवा पुरस्कार” वेंगुर्ले-अणसुर येथील युवा गायक तेजस मेस्त्री याला जाहीर झाला आहे.दरवर्षी युवा कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो.दरम्यान यावर्षीचा मान तेजसला मिळाल्याने संगीत क्षेत्रातील त्याच्या मित्र-परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.तर हा महोत्सव ६ व ७ मार्चला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होणार असून यावेळी तेजसला मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तेजस हा वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर गावचा सुपुत्र असून सध्या तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमध्ये संगीत विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.त्याचे संगीतातील विशारद पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला येथील गुरू सौ.अनघा गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. सध्या पुणे येथे पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि संगीतकार पं.हेमंत पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयातील पुढील शिक्षण घेत आहे.
दुबई येथील संगीतप्रेमी रसिक श्रीरंग कुलकर्णी यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्मृतीचिन्ह व दहा हजार रुपये रोख असे स्वरूप आहे.तर मनहर संगीत सभेचे प्रमुख हेमंत पेंडसे,मधुरा पेंडसे व पदाधिकारी अनिल पटवर्धन,राधिका ताम्हनकर, पुष्कर देशपांडे या निवड समितीने तेजसची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
ज्येष्ठ सितारवादक कै. सरिता सुरेश मित्रगोत्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित केला जाणारा सूर-सरिता संगीत महोत्सव यंदा ६ आणि ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून प्रसिद्ध कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.यंदा हा महोत्सव ऑनलाईन रंगणार आहे.मित्रगोत्री परिवार व मनहर संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा महोत्सव या वर्षी ऑनलाईन होणार असला तरी रसिकांसाठी दरवर्षीप्रमाणेच विनामूल्य असणार आहे.या महोत्सवाचे प्रसारण दोन्ही दिवस सायंकाळी ७ वाजता पंडित हेमंत पेंडसे यांच्या फेसबुक पेज आणि यू-ट्यूब चॅनलवरून केले जाणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. ६ मार्च) संपदा भालेराव (अमेरिका) यांचे सतारवादन होणार असून त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि संगीतकार पंडित हेमंत पेंडसे (पुणे) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.दुसर्या दिवशी (दि. ७ मार्च) पंडित सुधीर नायक (मुंबई) यांचे सोलो हार्मोनिअम वादन होणार असून विदुषी डॉ. पौर्णिमा धुमाळे (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाने सूर-सरिता महोत्सवाचा समारोप होणार आहे. चॅझ हॅस्टिंग्ज्, विघ्नेश कामत, अभिजित बारटक्के व पंडित अरुण गवई (तबला वादक) आणि लिलाधर चक्रदेव, स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम वादक) यांची साथसंगत आहे. डॉटव्हेव स्टुडिओमध्ये महोत्सवाचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_