कै. अभय देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परुळे येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
_*🛑 कै. अभय देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परुळे येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२१:-* शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी कै.अभय देसाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत परुळे येथे करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अविनाश देसाई यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले तर डॉ प्रणव प्रभू यांनी कै अभय देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, डॉ अपूर्वा पिंगुळकर, डॉ चैताली हळदवणेकर, डॉ श्वेता शर्मा, डॉ साईल, नेत्रतज्ज्ञ मिर्नवास परब, राजेंद्र जोशी ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी चे गुरु देसाई ,विजय घोलेकर, पप्पू पेडणेकर,साई केरकर, उमेश परुळेकर,गीतेश वाडयेकर, मयुरेश वाडयेकर, नाना वेंगुर्लेकर,किरण वेंगुर्लेकर ओंकार देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी,दंत चिकित्सा, आयुर्वेद उपचार, निसर्गोपचार, जनरल तपासणी इत्यादी करण्यात आल्या या शिबिराचा लाभ 332 रुग्णांनी घेतला तसेच यावेळी अभय देसाई ट्रस्टच्या वतीने सर्व रुग्णांना अल्पोपहार व आवश्यकतेनुसार औषधे मोफत देण्यात आली तसेच 100 नेत्र रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येणार आहे असे अभय देसाई ट्रस्टचे विश्वस्त श्री अमेय देसाई व ओंकार देसाई यांनी सांगितले या शिबिराला चीपी गावचे सरपंच गणेश तारी, परुळे गावचे माजी सरपंच प्रदीप प्रभू, योगेश तेली, मनोहर येरम, ग्रामसेवक श्री शरद शिंदे, युवा उद्योजक संकेत ठाकूर यांनी भेट व शिबिराला शुभेच्छा दिल्या तसेच महादेव मेडिकल व ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी तसेच डॉ प्रणव प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कै अभय देसाई ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री अमेय देसाई यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केले.
*…………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*