संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त डाँक्टर, महावितरणचे कर्मचारी, गावात काम करणारे समाजसेवक अशा कोरोना योद्ध्यांचा भेटवस्तु देऊन सत्कार…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴वैभववाडी : दि. १२ सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संदेश पारकर यांनी मोठा संघर्ष केला, वेळेप्रसंगी हल्ले सोसले आहेत, यामुळेच हे नेतृत्व घडले आहे, अस कौतुक शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले. युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, राजू शेट्ये, तालुका प्रमुख मंगेश लोके, संदेश पटेल, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, माजी नगरसेवक संतोष पवार, माजी उपसभापती अंबाजी हुंबे, उपतालुका प्रमुख दिलीप नारकर, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटपकर, सोनाळी सरपंच भिमराव भोसले,लोरे सरपंच विलास नावळे, खांबाळे सरपंच गौरी पवार, मनोज सावंत आदी उपस्थित होते.
रावराणे म्हणाले, पारकर यांचा वाढदिवस म्हणजे जिल्ह्यातील तरुणांचा एक उत्सव असतो. सर्वजण मोठ्या उत्साहाने तो साजरा करतात. यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आपला वाढदिवस समाजोपयोगी ठरावा याकरिता रक्तदान शिबीरासारखे अनेक उपक्रम हे राबवित आले. समाजाशी नाळ जोडलेल हे व्यक्तिमत्व आहे. जिल्ह्यात सांस्कृतिक चळवळ यांच्यामुळेच वाढली. आता होत असलेले महोत्सव हे पारकरांनी स्वतः कणकवली येथून सुरू केले होते. पारकर यांनी सुरवातीपासुनच संघर्ष केला. जिल्ह्यातील राडा संस्कृतीला सर्वप्रथम विरोध करणारे पारकर हे पहीले नेते होते. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाले, पण ते डगमगले नाही. जनतेच्या हितासाठी सदैव लढत राहिले, अस हे हरहुन्नरी नेतृत्व आहे. अशा शब्दांत अतुल रावराणे यांनी कौतुक केलं.
राजू शेटये म्हणाले, तरुणांना लाजवेल अस पारकर यांच काम आहे. सर्वसामान्यांचा आधार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. डाँक्टर, महावितरणचे कर्मचारी, गावात काम करणारे समाजसेवक यांचा यानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वप्नील धुरी यांनी केले.

