शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा वाढदिवस बुधवार दि. १४ जुलै रोजी कणकवली तालुक्यातील मातोश्री हॉलवर विविध सामाजिक कार्यक्रमांनी होणार साजरा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. १२ शिवसेना युवानेते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान संदेश पारकर यांचा वाढदिवस बुधवार दि. १४ जुलै २०२१ रोजी कणकवली तालुक्यातील मातोश्री हॉलवर विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
यादिवशी सकाळी ८ वाजता कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता तहसील अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी कर्मचारी, MSEB अधिकारी कर्मचारी व कोरोना काळात सामाजिक काम केलेल्या कार्यकर्त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन सत्कार केला जाणार आहे, तसेच यावेळी गरजूंना छत्रीवाटप देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, आमदार दिपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदिप बोरकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, गौरीशंकर खोत, अतुल रावराणे, बाळा भिसे, शिवसेना प्रवक्त्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गितेश कडू आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी कणकवली तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी तसेच संदेश पारकर व कै. सुबोध टिकले प्रेमींनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजु शेट्ये, संदेश पटेल, अँड. हर्षद गावडे, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अवधुत मालवणकर, शेखर राणे, प्रसाद अंधारी व संदेश पारकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

