आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे कोकणातल्या राजकारणातील कुविख्यात दाऊद इब्राहिम – शिवसेना नेते संदेश पारकर यांचा घणाघात

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. १४ आमदार नितेश राणे कोकणातल्या राजकारणातील कुविख्यात दाऊद इब्राहिम आहेत असा घणाघात शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणेंनी पर्ससीन मच्छिमारांची संस्था स्थापन केली आणि त्यांच्याकडून राणे हफ्ते घेत होते. पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससीन वादात जेव्हा पारंपरिक मच्छिमारांची डोकी फुटली तेव्हा आमदार वैभव नाईक येथील पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने राहिले. वैभव नाईक यांनी विधिमंडळात आवाज उठवून न्याय मिळवून दिला. त्यावेळी पर्ससीन मच्छीमारांची भलावण करणारे राणे आता पारंपरिक मच्छिमारांचा कळवळा आणतायत. राणेंचे हे पुतनामावशीचे प्रेम असल्याची टीका पारकर यांनी केली. मुंबईत चिंटू शेखवर कोणी गोळीबार केला ? कणकवलीत वकिलांची आणि नगरसेविकेची गाडी कोणी जाळली ? कुडाळ मधील होंडा शो रूम कोणी जाळले ? गोव्यात टोलनाका कोणी फोडला ? हे सिंधुदुर्गसह महाराष्ट्राला माहिती आहे. मंत्री असताना राणे महावसुलमंत्री ख्याती होती. जुहू येथील इस्टेला हॉटेल चे मालक हितेश केसवाणी यांच्याकडे दरमहा १० लाखांची खंडणी नितेश राणेंनी मागितली होती. याचे कॉल रेकॉर्ड पोलिसांकडे आहेत. ही खंडणी न दिल्याने नितेश राणेंच्या गुंडांनी इस्टेला हॉटेल फोडले. किरण सामंत हे कोकणातील मोठे ठेकेदार आहे. त्यांचे वडीलही मोठे ठेकेदार आहेत. त्यांनी कष्टाने व्यवसाय उभारून व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले आहे. किरण सामंत यांनी कोणाच्या गाड्या फोडल्या नाहीत, खंडणी वसूल केली नाही, गुंडगिरी केली नाही. आमदार नितेश राणेंनी किरण सामंत वर सचिन वाझे म्हणून केलेले आरोप म्हणजे नितेश राणेंची स्टंटबाजी असल्याची टीकाही पारकर यांनी केली.

यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, हर्षद गावडे, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!