आणखीकोकणशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मनसेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके यांची पंचायत समिती सावंतवाडी येथे भेट घेऊन केली चर्चा…

🛑 ग्रामीण भागातील ज्या मुलांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही, त्या – त्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात तसेच वाढीव फी संदर्भात झाली चर्चा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि.१२ ग्रामीण भागातील ज्या मुलांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही. त्या – त्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात तसेच वाढीव फी संदर्भात आज मनसेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके यांची पंचायत समिती सावंतवाडी येथे भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यतर्फे विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स आणि सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत शासनाने नेमके कोणते निकष ठेवले आहेत या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील काही मुलांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही त्या त्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात तसेच वाढीव फी संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके यांना जाब विचारला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत फी संदर्भात सर्व शाळांशी आपण चर्चा करू व आवश्यक त्या ठिकाणी सरप्राईज विजिट देऊ असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!