कृषिराजकीय

शेतकऱ्यांनो परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकू नका-खासदार विनायक राऊत

वैभववाडी प्रतिनिधी
शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी बळीराजा आत्मसन्मान ही योजना आहे फायदेशीर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त काजुची झाडे लावावीत आता काजुतूनच क्रांती होणार कोल्हापूर-विजयदुर्ग रेल्वे मार्ग हा मार्ग आम्ही पुर्णत्वास नेणार मार्ग होणार यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण जोडले जाणार शेतकऱ्यांना पायावर उभे राहण्यासाठी ही योजना सन्मानजनक खा.राऊत यांनी या योजनेचे केले कौतुक शेतकऱ्यांनी परप्रांतीयांना जमीन न विकता त्यामध्ये काजू लावावीत असे आवाहन खा राऊत यांनी केले.
‘बळीराजा आत्मसन्मान’ योजनेचा शनिवारी वैभववाडीत खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
बळीराजा आत्मसन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५००० शेतकऱ्यांना ५०००० काजू कलमांचे व खतांचे वाटप करत असताना, भैरी भवानी प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येणारी ही योजना शास्वत आर्थिक उत्पन्न देणारी ठरेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त करत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांची प्रशंसा केली. याशिवाय तुमची जमिन हिच तुमची खरी संपत्ती असून ती विकू नका, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकप्रमुख मंगेश लोके, जि. प. माजी सभापती संदेश पटेल, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगरसेवक संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, तालुका संघटक अशोक रावराणे, लोरे नं. 1 चे माजी सरपंच राजू रावराणे, अंबाजी हुंबे , माजी सभापती लक्ष्मण रावराणे, स्वप्निल धुरी, धुळाजी काळे, महेश रावराणे,आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!