दयानंद कांबळे याने भुईबावडा येथे भाजी व्यवसाय सुरू करून तरुणांसमोर ठेवला एक आदर्श..
_*🛑 दयानंद कांबळे याने भुईबावडा येथे भाजी व्यवसाय सुरू करून तरुणांसमोर ठेवला एक आदर्श..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-०७ :-* गतवर्षी कोरोनाने देशात हाहाकार उडवला. अनेकांचे रोजगार, नोकऱ्या गेल्या, उद्योग धंदे बंद पडले. त्यामुळे शासकीय नोकऱ्या वगळता इतर नोकरदार वर्ग जगण्यासाठी धडपड करू लागला. काहींनी नोकरीच्या मागे न लागता आपले छोटेशे व्यवसाय उभे केले. भाजीपाला, आदी वस्तू विक्रींचे व्यवसाय सुरू केले. त्यातून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु अपयशाला न घाबरता संकटाचा सामना करत खंबीरपणे उभे राहिले. कारण त्यांच्या अंगी जिद्द होती. संकटाशी दोन हात करण्याची ताकद होती. असच एक व्यक्तीमत्व म्हणजे कोरोनाच्या लाटेत ‘वकिली’ ची नोकरी गमावलेले तालुक्यातील हेत गावचे सुपुत्र दयानंद कांबळे या तरुणाने भुईबावडा येथे भाजी व्यवसाय सुरू करून तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
दयानंद कांबळे याने १२ वी पर्यंतचे शिक्षण भुईबावडा येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने पदवीचे पुढील शिक्षण मुंबई येथे पूर्ण केले. मुळातच त्याला कष्ट करण्याची आवड असल्याने पावसाळ्यात भातशेतीही करत होता. सोबतच वडिलांनी केलेली तुटपुंजी आंबा, काजू लागवड यांची देखभाल करणे. तसेच नवनवीन औषधी रोपांची लागवड करणे. यामध्ये शतावरी, कोरफड असे बरेच काही नवनवीन प्रयोग त्यांने कॉलेजमध्ये असताना केले. आजही तो अगदी लक्षपूर्वक करत आहे.
दरम्यानच्या काळात त्यांने आळंबी उत्पादन प्रशिक्षणाचे गावात वारे पसरले होते. तसेच गोपुरी आश्रम कणकवली संचलित या आश्रमात विविध शेतीविषयक निवासी कार्यशाळेत देखील त्याचा सहभाग होता. त्याने गोपुरीत राहून सर्व प्रात्यक्षिक समजून घेतले. मात्र आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असल्यामुळे त्याने गाव सोडून मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर त्याने बरेच छोटे मोठ्या नोकऱ्या केल्या. काहीकाळ महानगरपालिकामध्ये सफाई कामगार म्हणून काम केले. नंतर सीएसटी फोर्ट परिसरात एका प्रतिथयश हायकोर्ट वकिलांकडे असिस्टंट म्हणून नोकरी केली. परंतु खाजगी नोकरीतील अस्थिरता ही कायम टांगतीच असते.
दरम्यानच्या काळात त्याने शेतीविषयक कार्यशाळांना हजेरी लावत त्याने पुन्हा शेतीत स्थिर होण्याचे निश्चित केले. त्यातूनच औषधी हळदीचे दर्जेदार उत्पन्न त्याने आपल्या मित्रांच्या सोबतीने कोकणातील खेड तालुक्यात घेतले. तसेच दर्जेदार तांदळाचे देखील उत्पन्न घेऊ लागले. शिवाय शेतीत नवनवीन प्रयोगही करु लागला. हे सर्व सुरू असतानाच भुईबावडा येथे ‘सुभद्रा गृहोपयोगी मार्ट’ या नावाने भाजी व्यवसाय सुरू केला आहे.
*……………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🪔🎉–दिवाळी उत्सव ऑफर-ऑफर ,ऑफर🎉💥🪔*
*_💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0%_*
*_व्याज दर आणि सुलभ हफ्त्यावर🛍️_*
सोबत प्रत्येक लॅपटॉप च्या खरेदी वर मिळवा 1500/- ते 5000/- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास *FREE FREE FREE* 📣📣📣📣📣📣
*( Dell, Lenovo, HP, acer, ASUS )*
_वरील नामवंत ब्रॅण्ड चे सर्व लॅपटॉप हजर_ _स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव_
*Authorised Multibrand outlet*
*💁♂️तुमचे पुर्वीचे बजाज EMI कार्ड*
*असल्यास 0 प्रोसेसींग फी* _(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत)_
▪️नवीन बजाज EMI कार्डसाठी
आवश्यक कागदपत्रे व अटी
*• आधार कार्ड*
*• पॅन कार्ड*
*• बँक पास बुक*
(ग्राहकाचे वय 25 वर्ष पूर्ण असावे
लॅपटॉप च्या मूळ किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट रक्कम खरेदी च्या वेळी आवश्यक / उरलेल्या रकमेचे 0% ने 6 ते 10 महिन्यांचे समान हप्ते)
🤝🏻 एकदा अवश्य भेट द्या 🤝🏻
*🏮आस्था कॉम्प्युटर शॉपी🏮*
*पत्ता :* एस. टी. स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी
*📲 विनायक 9405099961 / अनिकेत 7410594392*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

