कोकणराजकीय

वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा भाजपच्या वतीने करण्यात आला सत्कार

दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा वर्षपूर्ती निमित्त भाजपा महिला संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिला पदाधिकारी यांनी श्री. जाधव यांना अभिनंदन पत्र देत त्यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी वैभववाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था त्यांनी जबाबदारीने सांभाळत काम केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने जीव धोक्यात घालून तालुक्यात चांगले काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!