सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कारिवडे ग्रामस्थांची सावंतवाडी नगरपालिका फसवणूक करत असल्याचा आरोप..

कारिवडेतील कचरा प्रकल्प कार्यान्वित करू नये अशी केली मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती..

प्रकल्प चालू करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि.१०: नगर परिषदेने कारिवडे येथील सर्वे नंबर १२४ (ब) हिचा नंबर.१ क्षेत्र ५ एकर या जागेत घनकचरा टाकणे व कुंपण भिंत घालने काम सुरू करणार असल्याचे कळवून एका पत्रामध्ये गांडूळ खत प्रकल्प तर दुसऱ्या प्रत्रात बायोगॅस प्रकल्प प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट इत्यादी प्रकल्प अशी परस्पर विरोधी पत्र देऊन कारिवडे ग्रामपंचायतीची दिशाभूल केली आहे. असा आरोप कारिवडे ग्रामस्थांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला असून या प्रकल्पाला कारिवडे  ग्रामपंचायतीचा विरोध असल्याचे म्हटले आहे.
दिनांक ७ एप्रिल २०१७ रोजी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व कारिवडे ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. त्यावेळी उपोषण कर्ते व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती झालेल्या बोलणीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कारिवडे ग्रामस्थ सदर जागेची पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र त्याबाबत अद्याप उचित कार्यवाही झाली नाही.

असे असताना सावंतवाडी नगरपालिका प्रशासनामार्फत सदर ठिकाणी कायमस्वरूपी कचरा प्रक्रिया मशिनरी बसविणे विषयी जोरदार हालचाली सुरू असल्याचे माहिती ग्रामपंचायतीला मिळाली आहे. सध्या जनता कोरोना मुळे हैराण झालेली असून आपल्या प्रशासनामार्फत कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केल्यास त्याचे गंभीर परिणाम परिसरातील तमाम जनतेच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. असे असताना आपल्या सदरचे कृत्य विश्वासघातकी किंबहुना कारिवडे वासियांवर अन्याय कारक कसे आहे.

तरी आपल्या प्रशासनामार्फत होऊ घातलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कार्यन्वित करू नये असे आपल्याला कारिवडे ग्रामस्थांच्यावतीने विनंती करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. व तसे न केल्यास कारिवडे ग्रामस्थांना आपल्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडून आमरण उपोषणही करावे लागेल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!