सावंतवाडी बसस्थानकातून पुर्ण क्षमतेने सुरु झालेल्या प्रवासी वाहतूकीचा लाभ घेण्याचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१०: एसटी बसस्थानकातून आता पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे, त्यामुळे प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्च पासून देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सरकारच्या आदेशानुसार एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली असल्याची माहिती सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
तसेच सावंतवाडी आगारातून कोल्हापूर, इचलकरंजी, रत्नागिरी, बेळगाव, पणजी येथील गाड्या देखील सुरू करण्यात आल्या असून याचा प्रवाश्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे, अरुण पवार, लिपिक राम वाडकर उपस्थित होते. यावेळी श्री पडोळे म्हणाले, सर्व एसटी स्वच्छ धुऊन सॅनिटाईझर करून वाहतुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. पूर्वी ५० टक्के वाहतुकीची मर्यादा होती ;मात्र आता खुले झाल्याने तसेच प्रवासी उपलब्ध झाल्याने पूर्वीसारखेच शंभर टक्के प्रवासी मर्यादा आता वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
कोल्हापूर, इचलकरंजी, रत्नागिरी, बेळगाव, पुणे, पणजी याठिकाणी एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मार्चपूर्वी ५५७ आगारातून रोज सोडण्यात यायच्या, त्यावेळी २४ हजार २५२ एवढ्या अंतरावर बस धावत असायची मात्र करोना काळात एसटी आगाराला याचा मोठा फटका बसला आहे.
सध्या ८ हजार किलोमीटर एसटीची वाहतूक सुरू आहे तर १८८ फेऱ्या सुरू केले आहेत. यामध्ये एसटी आगाराचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचेही ते म्हणाले. आता २२ सप्टेंबर पासून शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक ५० टक्के तिकीट सवलत व प्रवासी पास सुविधा याही सुरू असल्याचे ते म्हणाले.
शिवशाहीच्या गाड्या दोन सुरू असून पुणे येथे सकाळी ८.३० व सायंकाळी ७.४५ अशा फेऱ्या उपलब्ध आहेत. तर आगारातून इतर फेऱ्या आशा : पणजी येथे सकाळी ८.३० आणि दुपारी २.१५ अशा फेर्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर येथे १०.३० व इचलकरंजी येथे १२.३०, रत्नागिरी येथे सकाळी ७.३०, १० व दुपारी १ वाजता, बेळगाव तिलारी मार्गे दुपारी १ वाजता फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यासह इतर छोट्या-मोठ्या गावांकडे जाणाऱ्या स्थानिक फेऱ्या सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पुणे येथे ७.१५ वाजता आणि कोल्हापूर येथील एसटी सेवा सोमवार पासून सुरू होणार असून याचा लाभ नागरिकांना होणार आहे असे त्यांनी आवाहन केले आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

