भाजप महिला मोर्चाचे सोमवारी चिपळूण येथे आंदोलन..
महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.नीलम गोंधळी यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.११: महाविकास आघाडीच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी भाजपच्या महिला आघाडीतर्फे चिपळूण येथे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.नीलम गोंधळी यांनी दिली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन शासनाचा निषेध करावा आणि अत्याचार रोखण्यासाठी
कडक कारवाई करण्यास भाग पाडावे असे आवाहनही सौ. गोंधळी यांनी केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सविस्तर निवेदन देऊन महाराष्ट्रात घडलेल्या अत्याचाराच्या पंचवीस गंभीर प्रकरणी लक्ष वेधले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अकरा वाजता
चिंचनाका येथे उत्तर रत्नागिरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. दक्षिण रत्नागिरीचे आंदोलन रत्नागिरी येथे होणार आहे अशी माहितीही सौ. गोंधळी यांनी दिली आहे.
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

