परुळे येथील कोविड केअर सेंटरचा आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण..

*परुळे येथील कोविड केअर सेंटरचा आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण..*

*शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्या खास प्रयत्नातून कोविड केअर सेंटरचा प्रारंभ..*

*अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा सामाजिक उपक्रम साकार..*

 

वेंगुर्ले,दि.२७:- म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई व त्यांच्या सहकार्यानी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा शनिवारी आमदार दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते पार पडला. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ समाज सेवेसाठी सुरु करण्यात आलेल्या CCC साठी गावातील तसेच बाहेरील अनेक दानशूर व्यक्तींनी भरघोस मदत केली. अजूनही हा मदतीचा ओघ तसाच चालू आहे. या कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना उत्तम दर्जाची मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे. ज्यात सकाळचा चहा, नाष्टा दुपारचे वं रात्रीचे जेवण तसेच लागणारी औषधे याचा समावेश आहे. गावातील रुग्णांनी आपल्या आरोग्यासाठी या CCC चा फायदा करून घ्यावा असे आवाहन कोविड केयर सेंटरच्या संचालकांनी केले आहे. आपल्या जवळच्या परिसरातील रूग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले की तिथले पेशंट बघूनच मानसिक रित्या रूग्ण खचून जातात व रूग्ण बरे होण्यास वेळ लागतो त्यामूळे आपल्या जवळच्या वातावरात रूग्ण राहिले तर ते लवकर बरे होण्यास मदत होईल असे सचिन देसाई यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी परुळे येथे पंचक्रोशीतील ग्रामस्तांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे ठरविले व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम सत्यातही उतरविला.
या कोरोना केअर सेंटरसाठी आमदार दीपक केसरकर यांनी १० बेड, चिपी ग्रा.पं. कडून ५ बेड व भोगवे ग्रा.पं. कडून १० बेड, कै सुनील म्हापणकर यांच्या स्मरणार्थ रोहित म्हापणकर यांच्याकडून ४ बेड, पीपीइ किट, हॅन्ड ग्लोज, थर्मल गन, राधारंग फाउंडेशन कडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांच्यासहित कै.राजा शिरसाट यांच्या स्मरणार्थ अनमोल शिरसाट यांच्याकडून बेड सेट, प्रशांत मालवणकर यांच्याकडून १ हजार मास्क, १० पीपीइ किट, गुरू देसाई व संकेत ठाकूर यांच्याकडून ५० लिटर सॅनिटायझर, पंकज देसाई यांच्याकडून ३० फेस शिल्ड, डॉ प्रणव प्रभू व दर्शन पाटकर यांच्याकडून ५० पीपीइ किट, कै.अभयकुमार देसाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून नाश्ता व जेवणाची मोफत सोय, कुशेवाडा उपसरपंच नीलेश सामंत यांच्याकडून ५ हजार रु आर्थिक मदत तसेच ओंकार देसाई व सचिन कांबळी यांच्या कडून वस्तू स्वरूपात मदत अशा प्रकारे मदत करण्यात आली आहे.
या कोविड केयर सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यास आमदार दीपक केसरकर, उपजिल्हा प्रमुख श्री सचिन देसाई, उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळू परब, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, कुशेवाडा ग्रामपंचायत सदस्य निलेश परुळेकर , परुळे उपसरपंच मनीषा नेवाळकर, परुळे माजी उपसरपंच विजय घोलेकर, परुळे ग्रामपंचायत सदस्य शांताराम पेडणेकर, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, भोगवे ग्रामपंचायत सदस्य मांजरेकर मॅडम , चिपी सरपंच गणेश तारी, चिपी ग्रामपंचायतसदस्य चव्हाण मॅडम, निवती सरपंच भारती धुरी
केळूस सरपंच केळुस्कर, म्हापण उपसरपंच अशोक पाटकर, उपतालुका प्रमुख मनोहर येरम, वैद्यकीय अधिकारी चिंदरकर मॅडम , म्हापण महसूल विभागाचे सरकल सिंगनाथ, विभाग प्रमुख योगेश तेली, उपविभाग प्रमुख वसंत साटम, भोगवे सोसायटी चेअरमन चेतन सामंत, परुळे सोसायटी चेअरमन विष्णू माधव, संस्थेचे संचालक अमेय देसाई, ग्रामसेवक मंगेश नाईक, मुख्याध्यापक माने सर हे मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!