भाजपचे आंदोलन हे फक्त जनहितार्थ होते-मोहिनी मडगांवकर

*सावंतवाडी दि.२७-:* आमच्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी ओबीसो आरक्षण मिळावे म्हणून कोरोनाला न घाबरता जीव धोक्यात घालून भाजप पक्षान केलेलं आंदोलन हे जनहितासाठी केलेलं आंदोलन आहे, असे मत भाजपच्या सावंतवाडी मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केलं

मडगावकर म्हणाल्या, भाजप पक्षाने काल कुडाळ येथे केलेल्या आंदोलनावरून सोशल मीडियावर किंवा बाकी जनतेकडून भाजपच आंदोलन हे कोरोना वाढण्याचा खूप धोका असल्याच तसेच राजकारण्यांना एक नियम व सामान्य जनतेला एक नियम, अशी चर्चा चालू आहे. पण आम्ही हे जे आंदोलन केले ते सामान्य जनतेच्या भल्यासाठीच केले. ओबीसी आरक्षण हे शैक्षणिक नोकरी संदर्भात किती महत्वाचे आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कोरोनाला घाबरून जर घरात बसलो तर सरकारही आरक्षण रद्द करून टाकेल, हे कळणार पण नाही. नंतर तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही. आता राजकीय आरक्षण रद्द करायचा निर्णय झाल्यास पुढे शैक्षणिक नोकरी संदर्भातही आरक्षण रद्द होऊ शकते. आम्हाला पण कोरोनाच गांभीर्य माहीत आहे, आम्ही आमचा जीव धोक्यात घालून हे आंदोलन केले ते येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी, आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे. आमचे नेते निलेश राणे, नितेश राणे हे सामान्यांसाठी ओबीसो आरक्षण मिळावे म्हणून या आंदोलनावेळी हजर राहिले, असे सांगत भाजप पक्षाचं हे आंदोलन जनहितासाठी केलेलं आंदोलन आहे, असेही मडगावकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!