पत्रादेवी चेक पोस्टवर १९ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त..
अवैद्य दारू वाहतुकीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करतात हे कोकण लाईव्ह चे वृत्त ठरले खरे..
अल्पवयीन क्लिनर पोलिसांच्या ताब्यात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि.१०: झटपट श्रीमंत होण्यासाठी अल्पवयीन मुले चोरटी दारू वाहतूक करण्यासाठी वापरली जातात अशाप्रकारचा संपादकीय लेख ‘कोकण लाईव्ह’ने प्रसिद्ध करताच त्याचा प्रत्यय आज पेडणे येथे झालेल्या कारवाईत दिसून आला गाडीचा क्लीनर हा अल्पवयीन आहे तर चालक पसार आहे. या ट्रकमध्ये ७ लाख ३१ हजाराची दारू व १२ लाखाचा ट्रक मिळून १९ लाख ३१ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याचे पेडणे एक्ससाइज अधिकाऱ्यांनी सांगितले.चालक पसार केला की झाला याबाबत मात्र चर्चा आहे.
महाराष्ट्र-गोवा पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यावर पेडणे एक्साइज विभागाने महाराष्ट्रात केल्या जाणार्या अवैध दारु वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. गोवा बनावटीच्या ७ लाख ३१ हजारांच्या दारुसह सुमारे १२ लाखांचा ट्रक असा एकूण १९ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंधाराचा फायदा घेत चालक जंगलातून फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र अल्पवयीन क्लीनर अधिकार्यांच्या हाती सापडला यामुळे दारुधंद्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो या कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या म्हणण्यावर शिक्का मोर्तब झाले आहे.
ही कारवाई शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बेकायदा दारु वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (एमएच ४८ एवाय ५९१६) ताब्यात घेण्यात आला आहे.
ही कारवाई उपनिरीक्षक मोहनदास गोवेकर व त्यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक अमोल हरवळकर व विभूती शेट्ये करीत आहेत. गेल्या तीन महिन्यात या चेकपोस्टवर झालेली ही तिसरी सर्वात मोठी दारु कारवाई आहे.
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

