जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळण्या मागे दीपक केसरकर यांचे योगदान -पालकमंत्री उदय सामंत

 

  • अखर्चित निधी खर्च करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात महसूल विभागाचे स्वतंत्र बैठक

*सावंतवाडी दि.२५-:* जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून देण्याचे श्रेय माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आहे. त्यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणला होता. परंतु तो काही ठिकाणी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तसेच शहरातील विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला असून देखील जागा हस्तांतरण न झाल्याने विकास कामे अडकून पडली आहेत. त्यासाठी येत्या १५ दिवसात महसूल विभागाची बैठक लावू असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
यावेळी नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणासाठी आपण नक्कीच निधी देवू, ती आपली जबाबदारी राहील असा शब्द पालकमंत्री सामंत यांनी दिला. राजा हरिश्चंद्र यांनी स्वप्नात दिलेले वचन पूर्ण केले, त्या वचनाला ते जागले, त्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आम्हाला प्रत्यक्षात दिलेले वचन पूर्ण करतील असा विश्वास बोलताना व्यक्त केला यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात राजा हरिश्चंद्र यांनी अशाच माणसांची वचन पूर्ण केली की ते दिलेल्या शब्दावर ठाम राहिलेत आपला शब्द बदलला नाही, त्यांचीच वचने त्यांनी पाळली असा चिमटा नगराध्यक्ष संजू परब यांना काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!