कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

पालकमंत्री फंडातून कबरस्तान ईदगाह पर्यंत च्या रस्त्याचे डांबरीकरण करावे

पालकमंत्री फंडातून कबरस्तान ईदगाह पर्यंत च्या डांबरीकरण रस्त्याची केली मागणी

सावंतवाडीच्या दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांची आज मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी च्या शिष्टमंडळाने आकेरी विश्रामगृहावर भेट घेतली. मा. सामंत साहेब यांनी आपल्या पालकमंत्री फंडातून सावंतवाडी कबरस्तान ईदगाह वर नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या कच्चा रस्त्याचे काम पूर्ण करून त्या रस्त्यास डांबरीकरण करून मिळावे असे निवेदन कबरस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. व कब्रस्तान मधील उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चाही करण्यात आली. पालकमंत्री साहेबांनी आपण याकडे लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन दिले. याप्रसंगी कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तौकिर शेख, उपाध्यक्ष मुजीब शेख, सचिव परवेज बेग, खजिनदार सोहाब बेग, सल्लागार हिदायतुल्ला खान, सदस्य अल्ताफ मुल्ला, इरफान शेख, जावेद शहा, बसित पडवेकर, अरिफ करोल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!