क्राइम

उपनगराध्यक्ष सौ.अन्नपूर्णा कोरगांवकर यांच्या घरात घुसून राडा;गाडी पार्कींग विषयावरुन झाला वाद

 

पोलिस ठाण्यात पाच जणांवर गून्हा दाखल हे

सावंतवाडी, ता. ०४: येथिल पालिकेच्या भोसले उद्यानासमोरील पार्किंगच्या जागेत गाड्या पार्क केल्याच्या कारणावरुन येथिल उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर यांच्यासह मुलगा अखिलेश याला गौरेश कामत यांनी मारहाण केली. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येथिल उद्यानाच्या बाजूला असलेल्या श्री. कोरगावकर यांच्या घरासमोर घडली
या प्रकरणी कोरगावकर यांची मुलगी कुमारी ऐश्वर्या हीने दिलेल्या तक्रारीनुसार गौरेश कामत आणी अतिक सामंत यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर येथिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण त्या ठीकाणी चुकीच्या पध्दतीने पार्कींग केले जात आहे, याची विचारणा करण्यासाठी गेलो होतो,असे गौरेश कामत यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात परस्परविरोधी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!