जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांचा विचार करून बाजारपेठेचा वेळ वाढवा
माजी.पं.समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बाजारपेठा सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील असे आदेश दिले आहेत,आतापर्यंत निर्धारित वेळेतच बाजारपेठा उघडत आहेत जो या नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.परंतु शासनाने ठरवून दिलेल्या या निर्धारित वेळेचा त्रास ग्रामीण भागातील लोकांना जास्त होत आहे याच कारण म्हणजे बाजारपेठेतील बहुतेक दुकाने ही सकाळी ९ वाजल्यानंतर उघडत आहेत आणि ११ वाजता बंद होत आहेत.या वेळेमुळे गर्दी तर होतेच आहे शिवाय जिल्ह्यातील बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या वेळेत पोहचणे अवघड होत आहे.पावसाळा तोंडावर आला आहे ग्रामीण भागातील लोकांची शेतीची कामे सुरू होतील,काही जणांनी बांधायला काढलेली नवीन घरे पुर्णत्वास नेण्यासाठी त्यासाठी लागणारी साधन-सामुग्री खरेदी करण्यात येतील अशा वेळी ९ ते ११ ही वेळ ग्रामीण भागातील लोक शहरात पोहचेपर्यंत संपते आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाजारपेठेची वेळ निदान दुपारी १ वाजेपर्यंत तरी वाढवून द्यावी अशी विनंती माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी आमदार दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.सावंतवाडी प्रांताधिकारी खांडेकर साहेब यांनी सुद्धा या मागणीला सहमती दर्शवली आहे.आमदार केसरकर यांनी आपण जिल्ह्याधिकाऱ्यांकडे या वाढीव वेळेसाठी बोलणं करेन असे आश्वासन दिले आहे