कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका ,त्यांच्यावर सुमोटो कारवाई करावी -खा. विनायक राऊत

 

*_🛑 हिम्मत असेल तर रिफायनरी चा प्रस्ताव रेटून दाखवा_*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-३० ऑक्टोबर* केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. राणे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना दम भरला. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सूमोटो कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचं म्हटलंय. कार्यकर्त्यांच्या जीवितास धोका पोहचू शकतो. त्यामुळे पोलिसांनी या धमकीचा अभ्यास करुन सूमोटो कारवाई करावी, अशी मागणी खासदार राऊत यांनी केलीय.
नाणार रिफायनरी प्रकल्पाला काही वर्षांपूर्वी याच नारायण राणे आणि नितेश राणे यांनी विरोध करताना आंदोलनाला धार चढवली होती. कात्रादेवीच्या साक्षीने शपथ घेतली होती की मी कोणत्याही परिस्थितीत नाणार रिफायनरी होऊ देणार नाही. आता राणेंना भाजपमध्ये जाऊन काय उपरती झाली? स्वार्थासाठी सर्व विसरायचं आणि लोकांचा विश्वासघात करायचा ही राणेंची प्रवृत्ती आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत एक हजार एकर जागा स्वत:च्या नातेवाईकांच्या हॉटेल्सना दिली आहे. नातेवाईकांच्या हॉटेल्ससाठी जागा हडप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राणेंसारखा सत्तापिपासू माणूस करतोय. याची दखल सिंधुदुर्गवासीय घेतील, असा इशाराही विनायक राऊत यांनी राणेंना दिलाय.
*२०२४ची निवडणूक जिंकणारच- निलेश राणे*
दरम्यान, काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी 2024च्या निवडणुकीत मी जिंकणारच असाता दावा केलाय. कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. निलेश राणे यांनी कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचं बिगूल वाजवलं. निलेश राणे निवडणुकीबाबत घोषणा करतात सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून आणि घोषणाबाजी करत जोरदार प्रतिसाद दिला.
*हकालपट्टी सोडाच, दुसरं काही करायला लावू नका*
दरम्यान, निलेश राणे यांच्या निवडणुकीबाबतच्या घोषणेच्या अनुषंगाने नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरल्याचं पाहायला मिळालं. आगामी निवडणुकीत गद्दारी अजिबात खपवून घेणार नाही. मागील निवडणुकीत जे झालं ते मी सहन केलं. मात्र, पुढच्या निवडणुकीत कुमी गद्दारी केली तर हकालपट्टी सोडाच, पण दुसरं काही करायला लावू नका, अशा शब्दात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय.
*हिंमत असेल तर रिफायनरीचा प्रस्ताव रेटून दाखवा, राऊतांचं आव्हान*
नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केलीय. नाणार रिफानरी प्रकल्प होऊ नये म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्या भरुन मोर्चे काढले होते. त्यावेळी राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. आता सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना रिफायनरीचा कळवळा आलाय. पण हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरीचा प्रस्ताव रेटून दाखवावा, असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलंय.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!