शिवसेनेचा विजय जवळ आल्यामुळे गुरुनाथ पेडणेकर सैरभैर; माजी पं.स. सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांची जोरदार टीका
▪️इन्सुली गावात शिवसेनेचीच सत्ता येणार; बबन राणेंनी व्यक्त केला विश्वास
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.१४: इन्सुली शिवसेना माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सर्वप्रथम त्यांनी सभापती सौ. मानसी धुरी यांच्यावर निशाणा साधला. सभापती सौ. धुरी यांनी आपल्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. असे त्यांनी सांगितले. सौ.मानसी धुरी या लग्न करून इन्सुली गावात आत्ता आल्या आहेत. आपण १९८४ सालापासून राजकारण करतो आहे. त्यामुळे त्यांनी जेष्ठांवर टिका करण्यापेक्षा गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे. सभापती पदाला शोभेल असे काम करावे. असे श्री. राणे म्हणाले.
इन्सुली गावातील ग्रामसचिवालय भाजपच्या ठेकेदाराने बांधून अवघी काहीच वर्षे झाली आणि ग्रामसचिवालय मोडकळीस आले आहे. भाजपने गावात एकही विकास काम केले नाही आणि जी काही कामे झाली, त्याची अवस्था फार बिकट आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गावात खरी विकासकामे झाली आणि गावातील सगळ्या जनतेलाही माहिती आहे, शिवसेनेचे कार्य काय आहे. इन्सुली गावाचा पाया तत्कालीन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी रचला आणि कळस आमदार दीपक केसरकर यांनी घातला. त्यामुळे या दोघांनाच इन्सुली गावाच श्रेय जातं. असेही श्री. राणे म्हणाले.
काल गुरुनाथ पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टिका केली होती. तेव्हा ते बोलले की, शिवसेनेने काहीच विकासकामे केली नाही. तर मुद्दाम सांगावस वाटतं की, गुरुनाथ पेडणेकर यांचं इन्सुलीतील काम म्हणजे भोपळा! हे इन्सुलीतील सर्व जनतेला माहिती आहे. ते फक्त बोलबच्चन आहेत. हायस्कूलला रस्ता करतो असे भासवून तो रस्ता त्यांनी स्वतःच्या दारात नेला. शिक्षण आणि आरोग्य सभापती हे पद असताना सुद्धा हा माणूस गावात काही करु शकला नाही. तर त्यांनी विकासाची भाषा करु नये. गुरुनाथ पेडणेकर हे शिवसेनेचा विजय जवळ आल्यामुळे आता सैरभैर झाले आहेत. अशी जोरदार टीका करुन उद्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील जनता शिवसेनेलाच सत्ता देईल असा विश्वासही श्री. बबन राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी कृष्णा सावंत, साई राणे, सदा राणे, काका चराटकर, नाना पेडणेकर आदिंसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_